अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १५०० रुपयांची वाढ, पेन्शन योजनाही होणार लागू!!

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांच्या मागण्या अखेर राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना मोबाइल फोन आणि पेन्शन योजनेचा लाभ सुद्धा देण्यात येणार आहे.1500 rupees increase in salary of Anganwadi workers, pension scheme will also be implemented!!



अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य 

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करणे, नवीन मोबाइल उपलब्ध करून देणे, पेन्शन योजना लागू करणे या प्रमुख मागण्यांसाठी २० फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या कृती समिती आणि सर्व अंगणवाडी सेविकांनी राज्यव्यापी संप पुकारला होता. या काळात राज्यातील अंगणवाड्या बंद करून सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या संपात सहभागी झाल्या होत्या.

अंगणवाडी सेविकांसोबत राज्य सरकारची सकारात्मक चर्चा झाली असून या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तसेच सेवा समाप्ती झाल्यावर पेन्शन योजनाही सुरू करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण, कुपोषण निर्मुलन तसेच सहा वर्षांपर्यंतची बालके पोषण आहारापासून वंचित राहत होते त्यामुळे राज्य सरकारने चर्चेची भूमिका घेत या मागण्या मान्य केल्या आहेत.

1500 rupees increase in salary of Anganwadi workers, pension scheme will also be implemented!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात