प्रतिनिधी
नवी दिल्ली : सध्या ईशान्येत निवडणुकीचे वारे वाहत आहेत. येत्या 27 तारखेला नागालँड आणि मेघालय या दोन राज्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यासाठी भाजप प्रचारात व्यग्र आहे. भाजपचे बडे नेतेच नव्हे तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही तेथे सभा घेत आहेत. दरम्यान, शुक्रवारी नागालँडमध्ये निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी नागालँड भाजप अध्यक्ष तेमजेन इमना अलंग यांचे कौतुक केले. यानंतर सोशल मीडियावर आपल्या वेगळ्या स्टाईलसाठी ओळखल्या जाणाऱ्या इमना अलंग यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.’Guruji spoke! Bas hum to thanya ho gaye!’ Nagaland BJP leader Temjen thanked PM Modi
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
शुक्रवारी नागालँडमधील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांचे कौतुक केले. ते म्हणाले की, ‘तुमचे नेते तेमजेन इमना यांनी सोशल मीडियावर धमाल उडवून दिली आहे. संपूर्ण देश त्यांचे ऐकतो. डिजिटल प्लॅटफॉर्मवर ते नागालँड आणि ईशान्येकडील लोकांबद्दल उत्कृष्टपणे बोलत आहेत. मीही त्यांना सोशल मीडियावर पाहतो.”
गुरुजी ने बोल दिया ।बस, हम तो धन्य हो गए ! 😌🙏 Guruji ne bol diya! Bas Hum to Dhanya ho gaye!😌🙏🏼 @narendramodi pic.twitter.com/sJauW6Xw7V — Temjen Imna Along(Modi Ka Parivar) (@AlongImna) February 24, 2023
गुरुजी ने बोल दिया ।बस, हम तो धन्य हो गए ! 😌🙏
Guruji ne bol diya! Bas Hum to Dhanya ho gaye!😌🙏🏼
@narendramodi pic.twitter.com/sJauW6Xw7V
— Temjen Imna Along(Modi Ka Parivar) (@AlongImna) February 24, 2023
भारावून गेले तेमझेन
मंचावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले कौतुक ऐकून तेमजेन यांनाही खूप आनंद झाला. त्यांनी ट्विटरवर पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ शेअर करून कृतज्ञता व्यक्त केली आहे. व्हिडिओसोबत त्याने लिहिलेल्या कॅप्शनची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. त्यांनी लिहिले, ‘गुरुजी ने बोल दिया! बस हम तो धन्य हो गए!’
इमना यांच्या पोस्ट याआधीही झाल्या व्हायरल
याआधी त्यांनी लोकसंख्या नियंत्रणाबाबत असे काही बोलले होते, ज्याने खूप चर्चा झाली होते, खरे तर जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त त्यांनी ट्विट करून लोकसंख्या नियंत्रणाचा पर्याय सुचवला होता. ते म्हणाले की, ‘लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यांबाबत आपण समजूतदार होऊ या आणि मर्यादित मुलांचा विचार करू या. किंवा माझ्यासारखे अविवाहित राहून आपण लोकसंख्या नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाय देऊ शकतो. जनतेला आवाहन करून ते म्हणाले की, अविवाहित राहण्यासाठी चळवळीत या. त्याआधी अलंग यांनी त्याच्या छोट्या डोळ्यांबद्दलही वक्तव्य केले होते, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.”
विशेष म्हणजे नागालँडमध्ये 60 सदस्यीय विधानसभेच्या जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. सध्या राज्यात भाजप-एनडीपीपी युतीचे सरकार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App