विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : परकीय माध्यम संस्था ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतल्या कार्यालयांचे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सर्वेक्षण केल्यानंतर काँग्रेस सह सर्व विरोधी पक्षांनी देशात मोठा हल्लागुल्ला केला आहे. पण भाजपने काँग्रेसला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. Indira Gandhi banned BBC documentaries and reporting twice
बीबीसीच्या दोन कार्यालयांवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने छापे घातले नसून फक्त नियमानुसार सर्वेक्षण केले आहे, तर काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते एवढा हल्ला-गुल्ला करत आहेत. पण याच काँग्रेस पक्षाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकदा नव्हे तर दोनदा बीबीसीच्या डॉक्युमेंटरीवर बंदी घातल्याचा हवाला भाजपच्या नेत्यांनी दिला आहे
आपल्याला पप्पू म्हणणाऱ्यांना राहुल गांधींनी करून दिली गुंगी गुडियाची आठवण!
– केव्हा घातली होती डॉक्युमेंटरी वर बंदी??
1970 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना ब्रिटिश टेलिव्हिजन दोन वर बीबीसीने प्रकाशित केलेल्या दोन डॉक्युमेंटरीज दाखवण्यात आल्या होत्या. “कलकत्ता” आणि “फँटम इंडिया” अशी त्यांची नावे होती. भारताचे दैनंदिन जीवन त्यामध्ये चित्रित केल्याचा दावा त्यावेळी बीबीसीने केला होता. परंतु त्यामध्ये भारताचे दैनंदिन जीवन दाखविण्याच्या नावाखाली भारतातले केवळ दारिद्र्य आणि घाण दाखवून भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन करण्यात आली होती. त्यावेळी लंडनमध्ये राहणाऱ्या काही भारतीयांनी या दोन्ही डॉक्युमेंटरीज पाहिल्यावर त्यावर आक्षेप नोंदवला होता. भारतात देखील उच्च वर्तुळात त्यावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे इंदिराजींनी या दोन्ही डॉक्युमेंटरीजवर बंदी आणली होती.
1975 मध्ये इंदिराजींनी आणीबाणी लादून सर्व प्रसार माध्यमांचा गळा घोटला होता. त्यावेळी बीबीसीने आपले नवी दिल्लीतले प्रतिनिधी मार्क टुली यांना परत लंडनला बोलवून घेतले होते. मात्र त्यापूर्वीच काँग्रेस पक्षाच्या 41 खासदारांनी भारतात बीबीसीवर बंदी आणावी. कारण भारतातल्या सर्व बातम्या तोडून मरोडून बीबीसी दाखवत असते. त्यामुळे भारताची प्रतिमा मलिन होते, असा आरोप या खासदारांनी केला होता.
आज जेव्हा बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने छापे घातलेले नाहीत तर फक्त सर्वेक्षण केले आहे त्यावेळी काँग्रेस पक्षाचे सध्याचे नेते त्यावर अकांड तांडव करत आहेत. बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रकाशित केलेल्या द मोदी क्वेश्चन या डॉक्युमेंटरीकडे बोट दाखवत आहेत. पण आपल्याच काँग्रेस पक्षाच्या पंतप्रधानांनी एकदा नव्हे, तर दोनदा बीबीसी डॉक्युमेंटरीज वर आणि रिपोर्टिंग वर बंदी आणली होती, याचा सोयीस्कर विसर काँग्रेसजनांना पडला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App