वृत्तसंस्था
नवी दिल्ली : परकीय माध्यम संस्था ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात BBC च्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर इन्कम टॅक्सने छापे घातले. तेथे सर्वेक्षण सुरू आहे. त्या संदर्भात इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने व्यवस्थित खुलासाही केला आहे. Income tax department raided BBC offices in Delhi, Mumbai; Congress, Shivsena criticized the action as imposition of emergency rule
पण काँग्रेस आणि शिवसेना यांना देशात मोदी सरकारने लादलेल्या तथाकथित आणीबाणीची चाहूल लागली आहे. परकीय माध्यम संस्था बीबीसीवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने छापे घातल्यानंतर काँग्रेसला आणि शिवसेनेला आणीबाणीची आठवण होणे, ही पूर्णपणे राजकीय विसंगती आहे. हीच ती काँग्रेस आहे, ज्या पक्षाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये संपूर्ण देशावर प्रत्यक्षात आणीबाणी लादली होती आणि हीच ती शिवसेना आहे, ज्या पक्षाच्या प्रमुखांनी म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी आणीबाणीचे समर्थन केले होते. बाळासाहेबांनी स्वतःची अटक टाळण्यासाठी आणीबाणीचे समर्थन केल्याचा आरोप त्या वेळच्या अनेक राजकीय नेत्यांनी केला होता.
मात्र, आता बीबीसी सारख्या परकीय माध्यम समूहाच्या भारतातल्या दोन शहरांमधल्या कार्यालयांवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने छापे घातल्यानंतर त्याच काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांना केंद्रातल्या मोदी सरकारने आणीबाणी लादल्याचा भास झाला आहे.
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या 60 ते 70 अधिकार्यांनी एकाच वेळी दिल्ली आणि मुंबईतल्या बीबीसीच्या कार्यालयांवर छापे घालून सर्वेक्षण सुरू केले आहे. तिथल्या काही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे मोबाईल, लॅपटॉप आणि डेस्कटॉप ताब्यात घेऊन त्यांचा बॅकअपही घेतला आहे. त्यानंतर त्यांचे मोबाईलसह अन्य डिव्हाइस परत देखील दिले आहेत. पण या छाप्यामुळे अस्वस्थ होऊन काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देशात मोदी सरकारने आणीबाणी लादण्याचा आरोप केला आहे, तर सरकारने देश गुलामी ढकलल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App