प्रतिनिधी
पुणे : आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत भाजपने टिळक कुटुंब असल्या कोणाला उमेदवारी दिली नाही म्हणून टिळक कुटुंबीय आणि ब्राह्मण समाज नाराज असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. टिळक कुटुंबीयांची नाराजी काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांनी उघडपणे बोलून दाखवली आहे, तर काँग्रेसने जाहीर केलेले उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी टिळक वाड्यात पोहोचून टिळकांच्या गणपतीचे दर्शन घेऊन मुक्ता टिळकांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे भाजप विरोधातल्या नाराजीला काँग्रेसची वाट मिळेल, अशा अटकळी बांधल्या जात आहेत. Kasba Byelection : tilak family and brahmins unhappy with BJP, but will Congress be able to fight Unitedly??
या पार्श्वभूमीवर कसब्याची निवडणूक हिरीरीने लढविणाऱ्या काँग्रेसमध्ये तरी सर्व आलबेला आहे का?? हा खरा प्रश्न आहे. कारण रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्येही असंतोषाचे धुमारे फुटले आहेत. बाळासाहेब दाभेकर या जुन्या स्थानिक नेत्याने बंडखोरीचे दंड थोपटले आहेत. महाविकास आघाडी देखील एकसंधतेने रवींद्र धंगेकर यांच्या मागे उभे राहत असल्याचे चित्र दिसत नाही. कारण शिवसेनेबरोबर युती केलेल्या संभाजी ब्रिगेडने कसब्याची पोटनिवडणूक लढवण्याचा चंग बांधला आहे.
– अविनाश बागवे, तांबे एपिसोड घडविण्याच्या तयारीत
पुण्यात काँग्रेसचे सध्याचे वरिष्ठ नेते माजी शहराध्यक्ष आणि मंत्री रमेश बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे सत्यजित तांबे एपिसोडचे रिपीटेशन पुण्यात घडवण्याच्या तयारीत आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रमेश बागवे ज्यांच्या मतांमुळे पडले, त्या नगरसेवक रशीद शेख यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश दिल्याने रमेश बागवे आणि अविनाश बागवे नाराज आहेत. त्यामुळे अविनाश बागवे स्वतःचे राजकीय भवितव्य घडवण्यासाठी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या स्नेहभोजनाला रमेश बागवे यांना निमंत्रण देऊनही बागवे यांनी त्या स्नेहभोजनाकडे पाठ फिरवली होती. यातूनच त्यांच्या नाराजीची तीव्रता लक्षात येते.
नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे एपिसोड घडला त्यातून काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचे देखील स्पष्ट दिसले. काँग्रेसमधली ही दरी नाशिकमध्ये सुरू होऊन पुणे मार्गे अन्यत्र कुठे जाणार??, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
आम्ही टिळक कुटुंबाच्या कोणालातरी उमेदवारी देतो अजून 24 तास आहेत काँग्रेसने निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काँग्रेसला केले आहे.
याचा अर्थ भाजपमध्ये टिळक कुटुंबीयांना उमेदवारी दिली नाही म्हणून टिळक कुटुंबात आणि ब्राह्मण समाजात जशी नाराजी आहे, तशीच किंबहुना जास्त नाराजी काँग्रेसमध्ये कसब्यात आणि पुण्यात दिसत आहे. म्हणूनच भाजपला आव्हान देणारी काँग्रेस कसब्यात एकसंधतेने लढणार का??, हा खरा प्रश्न आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App