संकटातही विश्वास ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना २० हजार कोटी परत करण्याचा अदानींचा निर्णय! वाचा सविस्तर

वृत्तसंस्था

मुंबई : आंतरराष्ट्रीय पातळीवरून वेगळ्या षडयंत्राद्वारे अदानी समूहावर आर्थिक संकट आणण्यात आले आहे. अशा स्थितीत अदानी समूहाला भांडवली खर्च उभा करण्यासाठी फॉलोअप पब्लिक ऑफर अर्थात FPO द्वारे शेअर विकून कंपनीसाठी भांडवल उभे करण्याची संधी होती. मात्र अडाणी समूहाने ही संधी नैतिक दृष्ट्या नाकारली आहे. अदानी समूहाच्या बोर्ड मीटिंग नंतर स्वतः गौतम अदानी यांनी या संदर्भातील घोषणा केली आहे. Interest of my investors is paramount Gautam Adani’s first response after calling off Rs 20,000 crore FPO

ही घोषणा करताना गौतम अदानी म्हणतात :

पूर्णपणे सबस्क्राईब केलेले FPO मागे घेतल्याचा निर्णय घेतल्याने अनेक लोकांना आश्चर्याचा धक्का बसला असेल, पण शेअर बाजारात सध्याचे उतार चढाव लक्षात घेऊन अदानी समूहाच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या सध्याच्या अवस्थेत FPO मार्गे पुढे जाणे नैतिक दृष्ट्या कंपनीला मान्य नाही. तसे करणे नैतिकदृष्ट्या योग्यही नाही. त्यामुळे तो आम्ही मागे घेत आहोत.

कंपनीतल्या गुंतवणूकदारांचे हित हे आमच्यासाठी सर्वोपरि आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आम्ही FPO मागे घेतला आहे. या निर्णयामुळे कंपनीच्या सध्याच्या व्यवहारांवर आणि भविष्यातील योजनांवर दुष्परिणाम होणार नाही. आम्ही सध्या कंपनीच्या नियमित व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि तेच आम्ही सुरू ठेवू.

शेअर बाजारात स्थिरता आल्यानंतर आम्ही आमचे भांडवल आणि शेअर बाजारातील स्थिती यांची व्यवस्थित समीक्षा करू आणि त्यानंतर पुढचे निर्णय घेऊ. कारण आम्ही अतिशय जबाबदारीने व्यवसाय करतो आणि त्यातून आमचे व्यावसायिक मूल्य आणि विश्वासार्हता तयार झाली आहे. हे आमच्यासाठी नैतिक दृष्ट्या बळ देणारे आहे. आमच्या उच्च मूल्यांच्या आधारे कंपनीला अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याने आमच्यासाठी ही विश्वासार्हता सर्वात महत्त्वाची आहे.

IPO आणि FPO म्हणजे नेमके काय?

IPO : कंपन्यांना आपल्या व्यवसायवाढीसाठी भांडवल उभे करण्यासाठी कंपन्यांकडे कर्ज घेण्याचा मार्ग असतो. मात्र, कर्ज घेण्यापेक्षा कंपनी आपले शेअर्स विक्रीला काढून भांडवलाची तजवीज करते. ही शेअर्स विक्री करणे म्हणजे पब्लिक इश्यू काढणे. पब्लिक इश्यूचे प्रारंभिक आणि त्यानंतरचा असे दोन भाग पडतात. प्रारंभिक पब्लिक इश्यू म्हणजेच आयपीओ IPO (इनिशियल पब्लिक ऑफर ). त्यानंतरच्या इश्यूला एफपीओ FPO (फॉलोऑन पब्लिक ऑफर) म्हणतात.

आयपीओ (ipo) : व्यवसाय चांगला चाललेला असतो. कंपनीला नफाही चांगला मिळत असतो. भविष्यात वाढीची कंपनीला मोठी संधी असते. मात्र, या व्यवसायवाढीसाठी कंपनीकडे पुरेसे भांडवल उभे करण्यासाठी या कंपनीचे प्रवर्तक (प्रमोटर) आपल्या कंपनीचे शेअर्स सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी विक्रीस काढतात. हे शेअर्स आयपीओद्वारे विक्रीस काढले जातात. ह्या आयपीओचा कालावधी साधारणत: ४ दिवसांचा असतो. म्हणजे या ४ दिवसात या कंपनीचे शेअर्स विकत घेता येतात. त्यानंतर आयपीओ बंद होतो. त्यानंतर गुंतवणूकदारांना शेअर्सचं वाटप होते. मग ह्या वाटप केलेल्या शेअर्सची शेअर बाजारात नोंदणी होते. त्याला लिस्टिंग असे म्हणतात. आयपीओ काढणाऱ्या कंपनीची शेअर बाजारात नोंदणी होते. या सर्व प्रक्रियेनंतर हे शेअर्स गुंतवणूकदार शेअर बाजारात हवे तेव्हा विकू शकतात. तसंच इतर गुंतवणूकदारांनाही शेअर बाजारात या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी उपलब्ध होतात. आयपीओ घेण्यासाठी तुमच्याकडे डीमॅट असणे आवश्यक आहे.

आयपीओची प्रक्रिया : आयपीओची किंमत दोन पद्धतीने ठरवली जाते. एक फिक्स्ड प्राइस म्हणजेच निश्चित किंमत. आणि दुसरी म्हणजे बुक बिल्डिंग पद्धत.

फिक्स्ड प्राइस : यामध्ये कंपनी विक्रीस काढलेल्या शेअरची किंमत आधीच निश्चित करते. त्यामुळे शेअर्स किती रुपयांना विक्रीला आहेत हे गुंतवणूकदारांना समजते. त्यानंतर गुंतवणूकदार या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची की नाही याचा निर्णय घेतो.

बुक बिल्डिंग : या पद्धतीत शेअर्सचा किंमत पट्टा (प्राइस बँड) निश्चीत केला जातो. या किंमत पट्ट्यामध्ये गुंतवणूकदारांना बोली लावावी लागते. उदा.कंपनीने जर २०० ते २५० रुपये अशी किंमत पट्टा निश्चित केली असेल तर गुंतवणूकदारांना या किमतीदरम्यान बोली लावता येते. इश्यू उघडताना कंपनी शेअर्सची किंमत निश्चित करते. म्हणजे त्या भावाने शेअर्सची विक्री करते. ज्या भावावर सर्व शेअर्स विकले जातील तो भाव कंपनी निश्चित करते.

आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त २ लाख रूपयांपर्यंत शेअर्स खरेदीसाठी बोली लावू शकतो. आयपीओमध्ये लाॅटमध्ये बोली लावावी लागते. उदा. जर कोणत्या आयपीओमध्ये एका लाॅटमध्ये १५ शेअर्स आहेत तर गुंतवणूकदाराला कमीत कमी १५ शेअर्ससाठी बोली लावावी लागते म्हणजे १ लाॅट खरेदी करणं अनिवार्य आहे. त्यानंतर १५ च्या पटीत बोली लावावी लावते.

आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार आणि पात्र संस्थात्मक खरेदीदार (क्‍वॉलिफाईड इंस्‍टीट्यूशन बायर्स (क्‍यूआयबी) यांच्यासाठी शेअर्स राखीव ठेवले जातात. १९९९ पासून सर्व आयपीओंचे ५० ते ६० % शेअर क्‍यूआयबीसाठी राखीव ठेवले जातात. क्‍यूआयबी शेअरसाठी जेवढी किंमत निश्चित करते त्‍याला कट ऑफ ऑप्‍शन म्‍हणतात.

एफपीओ (Fpo) : आयपीओनंतर कंपनीची शेअर बाजारात नोंदणी होती. त्यानंतर काही कालावधीने कंपनीला व्यवसायवाढीसाठी पुन्हा भांडवलाची गरज भासते. अशा वेळी कंपनी पुन्हा आपले शेअर्स विक्रीला काढते. त्यालाच एफपीओ असं म्हणतात.

एफपीओमध्ये सहसा प्रवर्तक आपले शेअर्स विकतात. काही वेळेला कंपनी एफपीओमध्ये नवीन शेअर्सही जारी करते. जेव्हा कंपनी शेअर्सची विक्री फक्त आपल्या शेअर होल्डर्सना करते, त्याला राइट इश्यू म्हणतात. एफपीओ नवीन आणि जुन्या गुंतवणूकदारांसाठी असतो. एफपीओमध्ये सहसा स्वस्तात शेअर्स मिळतात. तर किरकोळ गुंतवणूकदारांना एफपीओमध्ये सूट दिली जाते. एफपीओमध्ये गुंतवणूक मोठा नफा मिळवू शकतात. एफपीओ जारी केल्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होते. अशा वेळी गुंतवणूकदारांना स्वस्तात शेअर खरेदी करता येतात.

Interest of my investors is paramount Gautam Adani’s first response after calling off Rs 20,000 crore FPO

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात