सत्यजित तांबेंवरून काँग्रेसला सल्ले देणाऱ्या राष्ट्रवादीवर सतीश इटकेलवारांच्या निलंबनाची वेळ

प्रतिनिधी

नागपूर : महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर भाजपशी विधान परिषद निवडणुकीत दोन हात करण्याची आक्रमक भाषा करणाऱ्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर भाजपची लढायचे सोडून आपल्याच पक्षाच्या बंडखोर उमेदवारांना निलंबित करण्याची वेळ आली आहे. सत्यजित तांबे आणि सतीश इटकेलवार अशी त्यांची नावे आहेत. Time for suspension of Satish Itkelwar on NCP for advising Congress on Satyajit Tambe

नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या मूळच्या काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांना काँग्रेसने त्यांचे वडील आमदार सुधीर तांबे यांच्या सह निलंबित केले आहे, तर सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीच्या मुद्द्यावर काँग्रेसला सल्ला देऊन त्या पक्षाच्या नेत्यांची मजा घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसवरही आपल्या बंडखोर उमेदवाराला निलंबित करण्याची वेळ नागपूरात आली आहे. नागपुरातून अपक्ष उमेदवारी दाखल करणारे सतीश इटकेलवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसने निलंबित केले आहे.



 

विधान परिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकांसाठी भाजपची टक्कर घेण्याची आक्रमक भाषा महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांनी केली होती. पण प्रत्यक्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरीची लागण झाली आणि त्यामुळे या दोन्ही पक्षांना आपापल्यास बंडखोरांविरुद्ध निवडणुकीत लढण्याची वेळ आली आहे.

त्यातही सत्यजित तांबेंची बंडखोरी आधी झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने काँग्रेसच्या नेतृत्वाची खिल्ली उडवली होती. कोणाला उमेदवारी द्यायची या मुद्द्यावर महाविकास आघाडीत आधी चर्चा करायला हवी होती. आता चर्चा करून उपयोग नाही वगैरे गोष्टी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सुनावल्या होत्या. पण आता नागपुरात सतीश इटकेलवार यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार नाही असे पाहून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे पक्षावर इटकेलवार यांना निलंबित करण्याची वेळ आल्याने राष्ट्रवादीची देखील काँग्रेस सारखीच किरकिरी झाली आहे.

Time for suspension of Satish Itkelwar on NCP for advising Congress on Satyajit Tambe

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात