अयोध्येत राम मंदिराच्या जागी पुन्हा मशिदीसाठी अल कायदाचा भारतात जिहादचा पुकारा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अवघ्या जगाचे लक्ष लागलेले अयोध्येतील राम मंदिर कधी उघडणार याची तारीख अमित शहा यांनी गुरुवारी सांगितली. त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजेच शुक्रवारी धमकीची बातमी आली आहे. उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्येतील हे राम मंदिर उडवून देण्याची धमकी अल कायदा या दहशतवादी संघटनेने दिली आहे. Al Qaeda’s call for jihad in India for a mosque in place of Ram temple in Ayodhya

अल कायदाने ‘गझवा ए हिंद’ या त्यांच्या नियतकालिकात यासंबंधीची धमकी दिली आहे. या नियतकालिकाच्या ताज्या अंकात अल कायदा ही संघटना अयोध्येतील राम मंदिर तोडून त्याठिकाणी पुन्हा मशिद बांधणार असल्याचे म्हटले आहे.

काय आहे नियतकालिकात?

गझवा ए हिंद या 100 पानांच्या नियतकालिकाच्या संपादकीयात म्हटले आहे की, ज्याप्रकारे बाबरी मशिदीच्या ढाच्यावर राम मंदिर बांधण्यात येत आहे. ते पाडले जाईल. मूर्तींच्या जागी अल्लाहच्या नावाने बाबरी मशिद बांधली जाईल. या सगळ्यासाठी बलिदान हवे आहे. त्यामुळे भारतातील सर्व मुस्लिमांनी या जिहादमध्ये सहभागी व्हावे.

भारतीय मुसलमानांना आवाहन

अल कायदाने भारतीय मुसलमानांना आवाहन केले आहे. तुम्ही भौतिक नुकसानाला घाबरू नका. अनेक दशकांपासून जीवन आणि संपत्तीचे नुकसान आपण झेलले आहे. हे जीवन जिहादसाठी वापरले असते तर एवढे नुकसान झाले नसते. भारतीय मुस्लिमांनी हे लक्षात ठेवावे. धर्मनिरपेक्षता ही नरकासमान आहे. हिंदू – मुस्लिम भाईचारा हे धोकादायक ठरू शकते, अशी चिथावणीखोर भाषा गझवा ए हिंद नियतकालिकाने वापरली आहे.

Al Qaeda’s call for jihad in India for a mosque in place of Ram temple in Ayodhya

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात