विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या मुद्द्यावर भाजप विरोधी पक्षांमध्ये प्रचंड मोठे राजकीय कन्फ्युजन असताना त्यात उत्तर प्रदेशातल्या समाजवादी पार्टीची देखील भर पडली आहे. समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी तीनच दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रेचे समाजवादी पार्टीला निमंत्रण आले नसल्याचे पत्रकारांना सांगितले होते. पण 3 जानेवारी 2023 उद्यापासून भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशात प्रवेश करत असताना काँग्रेसने अखिलेश यादव आणि समाजवादी पार्टीच्या नेत्यांना भारत जोडो यात्रेत सामील होण्यासाठी निमंत्रण दिले आहे. Congress invites Samajwadi party for bharat Jodo yatra, but Akhilesh Yadav will not participate
या निमंत्रणामुळे समाजवादी पक्षाची राजकीय कोंडी झाली आहे. कारण भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावे, तर क्रेडिट काँग्रेसला जाते आणि न व्हावे तर काँग्रेसला धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर साथ न देण्याचा ठपका येतो. या राजकीय कोंडीत समाजवादी पार्टी सापडली आहे. काँग्रेसचे निमंत्रण अखिलेश यादव यांनी नाकारले नाही आणि स्वीकारलेही नाही. पण समाजवादी पक्षाचे मुख्य प्रवक्ते राजेश सिंह यांनी भारत जोडो यात्रेत समाजवादी पार्टीचा एकही नेता सामील होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा यशस्वी होवो, अशा आशयाचे ट्विट अखिलेश यादव यांनी करून तो विषय संपला आहे.
भारत जोडो यात्रेतून राहुल गांधी हे स्वतःचे नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच 31 डिसेंबर 2022 वर्षाअखेरीच्या मुहूर्तावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राहुल गांधींची हॅट पंतप्रधान पदाच्या रिंग मध्ये टाकली आहे. अर्थात काँग्रेस मधून त्याला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला असला तरी बाकीच्या विरोधकांचा त्याला काहीही प्रतिसाद मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीच्या नेत्यांना काँग्रेस पक्षाने निमंत्रण दिल्यानंतरही ते नेते भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नसल्याने राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेला उत्तर प्रदेशातूनच खोडा बसणार हे एक प्रकारे सूचित झाले आहे.
मुलायम ते अखिलेश
अर्थात ही इतिहासाची पुनरावृत्ती देखील आहे. अखिलेश यादव यांचे वडील समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांनी सोनिया गांधी यांना पंतप्रधान पदाची संधी आली असताना ऐन वेळेला पाठिंबा द्यायचे नाकारून ती त्यांची संधी कायमची घालवली होती. अखिलेश यादव हे देखील भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे नाकारून राहुल गांधींच्या बाबतीत तेच करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App