जम्मूच्या राजौरीत हिंदू हत्याकांड; पण मेहबूबा मुफ्ती बरळल्या, इथं मुसलमान रोज मरतात, पण हिंदू मेले की त्याचे राजकारण करतात!!

वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात डांगरी गावामध्ये दहशतवाद्यांनी हिंदूंच्या घरांवर हल्ले करून बेछूट गोळीबार करत हिंदूंचे हत्याकांड घडविले, पण जम्मू – काश्मीरचे दोन माजी मुख्यमंत्री मात्र त्यासाठी भाजप आणि केंद्र सरकारलाच दोषी ठरवत आहेत. या दोन माजी मुख्यमंत्र्यांपैकी फारूक अब्दुल्लांनी केंद्रावर दोषारोप ठेवला आहे, तर त्या पलिकडे जाऊन मेहबूबा मुफ्ती बरळल्या आहेत. Terrorists targets hindus in Rajouri, but mehbooba mufti targets hindus and modi government

भारताला गांधी – नेहरूंनी धर्मनिरपेक्ष देश बनविले, पण आता त्याच देशाचे रूपांतर धर्मांध करण्यामागे गोडसेचे वारसदार लागले आहेत. इथं मुसलमान रोज मरत आहेत पण हिंदू मारले गेले की काही खुसूसी लोक राजकारण करतात, अशा शब्दात मेहबूबा मुक्ती यांनी हिंदू हत्याकांडावर अश्लाघ्य भाष्य केले आहे.

राजौरी जिल्ह्यातील डांगरी या गावात दहशतवाद्यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारी 2023 रोजी हल्ला करून एकाच कुटुंबातल्या चौघांना मारले. त्याच ठिकाणी आज सकाळी बॉम्बस्फोट घडवून एकाचा बळी घेतला. या स्फोटात 5 जण जखमी देखील झाले आहेत.

हल्ले दहशतवाद्यांचे, पण बरळणे दोन माजी मुख्यमंत्र्यांचे, अशी अवस्था जम्मू – काश्मीरमध्ये आली आहे. हिंदूंच्या हत्याकांडावर फारुख अब्दुल्लांनी केंद्र सरकारला दोष दिला आहे, देशामध्ये सतत हिंदू विरूद्ध मुस्लिम असे वातावरण तयार करून केंद्र सरकारने आणि भाजपने संपूर्ण देश खराब केला आहे. त्याचाच परिणाम म्हणून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले होत आहेत. गृहमंत्रालयाने आता हस्तक्षेप करून यातून तोडगा काढला पाहिजे, असे वक्तव्य फारूक अब्दुल्ला यांनी केले आहे.

तर मेहबूबा मुफ्ती यांनी गांधी नेहरू आणि गोडसे अशी जुनीच घिसीपीटी कॅसेट लावून दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध करण्याऐवजी केंद्र सरकारलाच बोल लावले आहेत. गांधी – नेहरूंनी भारत धर्मनिरपेक्ष बनविला होता. पण गोडसेच्या वारसदारांनी भारतात धर्मांधतेचे विष पेरले. इथं मुसलमान रोज मरत आहेत. त्यावर कोणी बोलत नाही. पण हिंदूंना मारले की लगेच काही राजकीय पक्ष त्याचा गैरफायदा उपटतात, असे वक्तव्य मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे. मेहबूबा यांनी हे वक्तव्य करून काश्मीर मधल्या दहशतवाद्यांना सहानुभूतीच दाखविली आहे.

हिंदूंचे हत्याकांड झालेल्या ठिकाणी राजौरीतील डांगरी गावात राष्ट्रीय तपास संस्था एनआयएचे पथक पोहोचले असून त्यांनी संपूर्ण घटनेचा तपास हाती घेतला आहे.

Terrorists targets hindus in Rajouri, but mehbooba mufti targets hindus and modi government

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात