प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. MPSC ने विविध पदांसाठीच्या भरतीकरता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिराती वेगवेगळ्या संवर्गासाठी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आयोगाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. MPSC : Recruitment in Health Department; How many seats for which posts?
आरोग्य विभागाच्या या भरतीअंतर्गत कोणत्या संवर्गासाठी किती जागा आहेत याबाबत विस्तृत माहिती खालीलप्रमाणे :
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य विमा सेवा, गट : ब संवर्गाची १५ पदे
कान- नाक- घसा तज्ञ (senior E.N.T. Surgeon ) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट : अ संवर्गाची २ पदे
मनोविकार तज्ञ (Senior Psychiatrist), महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट : अ संवर्गाचे १ पद
शरीरविकृती शास्त्रज्ञ (Senior Pathologist), महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट : अ संवर्गाची ३ पदे
बधिरीकरण शास्त्रज्ञ विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट : अ संवर्गाची ५ पदे
क्ष-किरण शास्त्रज्ञ विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट : अ संवर्गाची ३ पदे
नेत्ररोग तज्ञ विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट : अ संवर्गाची ५ पदे
बालरोग तज्ञ विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट : अ संर्वगाची ५ पदे
स्त्रीरोग व प्रसुती शास्त्रज्ञ विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट : अ संवर्गाची ७ पदे
अस्थिव्यंग शल्यचिकित्सक विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट : अ संवर्गाची ५ पदे
शल्यचिकित्सक विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट : अ संवर्गाची ८ पदे
भिषक विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट : अ संवर्गाची ८ पदे
अधिकृत वेबसाईट : https://mpsc.gov.in/.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App