वृत्तसंस्था
जयपूर : देशाच्या आर्थिक धोरणाच्या विविध मुद्द्यांवर केंद्रातील मोदी सरकारला सातत्याने घेरणारे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आज बुधवारी 14 डिसेंबर 2022 रोजी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सामील झाले. रघुराम राजन राहुल गांधी यांच्याबरोबर काही काळ भारत जोडो यात्रेत चालल्याने त्यांच्या राजकारणातल्या प्रवेशाविषयी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. Raghuram Rajan, who is constantly besieging the Modi government on economic policies, joins Rahulji’s Bharat Jodo Yatra
राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेत काँग्रेसचे सदस्य नसलेल्या परंतु लिबरल विचारसरणी असलेल्या अनेकांना सामील करून घेतले आहे. यामध्ये मेधा पाटकर अमोल पालेकर अभिनेत्री स्वरा भास्कर आदींचा समावेश होताच. त्यात आता रघुराम राजन यांची भर पडली आहे. हेच ते रघुराम राजन आहेत, ज्यांनी देशाच्या आर्थिक धोरणासंदर्भात केंद्रातील मोदी सरकारला वारंवार वेगवेगळ्या मुद्द्यांवर घेरले आहे.
पण त्यांनी आत्तापर्यंत उघड अशी कोणतीच राजकीय महत्त्वाकांक्षा दाखवली नव्हती. परंतु, आता राहुल गांधींबरोबर ते भारत जोडो यात्रेत चालल्याने त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा दिसून आली आहे. अर्थात सध्याच्या देशाच्या राजकीय पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडे राजकीय कल दाखवून त्यांची महत्त्वाकांक्षा कशी पूर्ण होणार?, हे आगामी काळात दिसण्याची शक्यता आहे.
रघुराम राजन यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या अनेक धोरणांवर टीका केली आहे. मोदी सरकार देशाशी खोटे बोलत असल्याचा आरोप रघुराम राजन यांनी केला होता. सध्या अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली नाही, परंतु तरीही सरकार सत्य स्वीकारण्यास तयार नाही. या प्रश्नाचे गांभीर्य सातत्याने कमी करत असल्याचा आरोप राजन यांनी केला होता. इतकेच नव्हे तर आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी मोदी सरकारला प्रथम ही समस्या आहे, हे मान्य करावे लागेल. कारण ती लपवून ठेवल्याने परिस्थिती सुधारणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता.
आज यात्रा के 98वें दिन भारत के पूर्व #RBI गवर्नर एवं प्रसिद्ध अर्थशास्त्री रघुराम राजन जी भारत जोड़ो यात्रा में शामिल हुए|#BharatJodoYatra pic.twitter.com/D9ERXVQT1T — With Congress (@WithCongress) December 14, 2022
आज यात्रा के 98वें दिन भारत के पूर्व #RBI गवर्नर एवं प्रसिद्ध अर्थशास्त्री रघुराम राजन जी भारत जोड़ो यात्रा में शामिल हुए|#BharatJodoYatra pic.twitter.com/D9ERXVQT1T
— With Congress (@WithCongress) December 14, 2022
कोण आहेत रघुराम राजन?
1963 मध्ये भोपाळ, मध्य प्रदेश येथे जन्मलेले रघुराम राजन हे भारताचे 23 वे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत. रिझर्व्ह बँकेमधील त्यांच्या कार्यकाळात, रघुराम राजन हे आंतरराष्ट्रीय सेटलमेंटसाठी बँकेचे उपाध्यक्ष होते. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात 2013 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारलेले राजन नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात 2016 पर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. त्यानंतर उर्जित पटेल आरबीआयचे गव्हर्नर झाले. रघुराम राजन यांनी आयआयटी दिल्लीमधून बीटेक आणि आयआयएम अहमदाबादमधून व्यवस्थापन पदवी आणि एमआयटीमधून पीएच.डी. केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App