प्रतिनिधी
मुंबई : बेळगाव परिसरात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातल्या 6 ट्रकवर दगडफेक केल्यानंतर सीमा भागातील परिस्थिती तणावपूर्ण बनली असून सीमा भागातील मराठी जनतेला धीर देण्यासाठी आपण बेळगावात या, असे मेसेज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला पाठविले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 24 तासात बेळगाव परिसरातील परिस्थिती शांत झाली नाही, तर आपल्याला नाईलाजाने बेळगावला यावे लागेल, असा इशारा त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिला आहे. Maharashtra karnataka boundary dispute, MES approach sharad Pawar to come to belgam
शरद पवारांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे त्यांनी पाच-सहा दिवस विश्रांती घेतली होती. पुढच्या आठ दहा दिवसांत त्यांच्या दुसऱ्या डोळ्यावरही शस्त्रक्रिया होणार आहे. परंतु, दरम्यानच्या काळात सीमा भागातला तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबईत सिल्वर ओक निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली आणि महाराष्ट्राच्या सीमा प्रश्नसंदर्भात विशिष्ट भूमिका मांडली. संसदेचे अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांनी एकत्र येऊन केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेऊन महाराष्ट्राची भूमिका एकत्रितपणे मांडावी, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. त्याच वेळी त्यांनी सीमा भागातून त्यांना आलेल्या मेसेजचे वाचन पत्रकारांसमोर केले. 2007-08 मध्ये जेव्हा सीमा भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा आर. आर. पाटील यांना सीमा भागात पाठवून आपण जनतेला धीर दिला होता. आता आपण जनतेला धीर घ्यायला या, असे मेसेज त्यांनी पत्रकारांना वाचून दाखविले.
कर्नाटकच्या निवडणुकीशी तणावाचा संबंध
कर्नाटकात विधानसभा निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बॉम्बे कदाचित चिथावणीखोर वक्तव्ये करत असतील, असा संशय शरद पवारांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राने मात्र आपली भूमिका एकमुखाने मांडावी. कारण आजपर्यंत महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकमुखाने सीमाप्रश्नासंदर्भात भूमिका मांडली आहे याकडे शरद पवारांनी लक्ष वेधले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App