वृत्तसंस्था
रामनाथपूरम : तामिळनाडूमध्ये तब्बल 360 कोटी रुपयांची ड्रग्स पकडली आहेत. या ड्रग्सचे कंटेनर श्रीलंकेत स्मगलिंग करून पाठवण्यात येणार होते. परंतु त्या आधीच कोस्टल पोलीस आणि केंद्रीय तपास संस्थांनी धडक कारवाई करून ही ड्रग्स पकडली आहेत. तामिळनाडूत एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्स पकडली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. Drugs worth Rs 360 crore seized in Tamil Nadu
या ड्रग्स स्मगलिंग संदर्भात रामेश्वरम तालुक्यातील कीझाकरई नगरपालिकेतील सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचा नगरसेवक (Keezhakarai Municipality) सरबराज नवाज (42) आणि त्याचा भाऊ माजी नगरसेवक जैनुद्दीन (45) यांना अटक करण्यात आली आहे. श्रीलंकेत ड्रग्सची मोठी खेप पाठवली जात आहे, याची टीप पोस्टल पोलिसांना मिळताच त्यांनी केंद्रीय तपास संस्थांसह रामनाथपुरम जिल्ह्यातील मंडपम – वेदलाई रोड वर विशेष शोध मोहीम चालविली. त्यावेळी रस्त्यावरून चाललेल्या एका वेगवान लक्झरी कारला पोलिसांनी थांबविले. त्या कार मध्येच तब्बल 360 कोटींची ड्रग्स लपवून चालवली होती.
Nanded Drugs : नांदेडमध्ये NCBची मोठी कारवाई, तब्बल 111 किलो ड्रग्ज जप्त
पोलिसांनी या कारमधून मोठ्या प्रमाणावर कोकेन जप्त केले. या कारमध्ये पोलीसांना 30 कंटेनर आढळले. ज्यात 20 लीटर कच्चे कोकेन ठेवले होते. पोलिसांनी ही लक्झरी कार जप्त करून सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचा नगरसेवक सरबराज नवाज आणि त्याचा भाऊ माजी नगरसेवक जैनुद्दीन या दोघांना अटक केली. या दोघांच्या कारमधून हे कोकेन रामेश्वर मध्ये राहणारा सादिक अली (36) याच्याकडे पोहोचविले जाणार होते. सादिक अली हा स्थानिक मच्छीमार असून तो हे कोकेन श्रीलंकेत पोहोचवणार होता.
तब्बल 360 कोटी रुपयांची ड्रग्स पकडल्यानंतर आरोपी प्रमुख नगरसेवक सर्व सरबराज नवाज आणि त्याचा भाऊ जैनुद्दीन यांचे कोणत्या आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करांशी संबंध आहेत याचा शोध केंद्रीय तपास संस्था आणि कोस्टल पोलीस घेत आहेत. ड्रग्स तस्करी प्रकरणात सत्ताधारी द्रमुक पक्षाचा नगरसेवक अटकेत गेल्यानंतर विरोधी अण्णाद्रमुक आणि भाजप या दोन्ही पक्षांनी द्रमुकला राजकीय दृष्ट्या घेरले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App