प्रतिनिधी
मुंबई/कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होत शिंदे फडणवीस सरकारला आव्हान उभे करण्याचा प्रयत्न चालवला आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते दररोज सरकारवर वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रखर हल्ले चढवत आहेत. यात शरद पवारांपासून अजित पवार ते सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत अनेक नेत्यांचा समावेश आहे. Though NCP leaders targets shinde Fadanavis government by words only, shinde splitting NCP
पण राष्ट्रवादीचे शिंदे – फडणवीस सरकार वरील हल्ले फक्त “बोलकेच” असल्याचे स्पष्ट होत आहे. कारण प्रत्यक्ष राजकीय कृतीत मात्र राष्ट्रवादीलाच गळती लागल्याचीच दिसून येत आहे. माजिद मेमन ते ए. वाय. पाटील असा हा गळतीचा प्रवास आहे.
शरद पवारांचे जुने जाणते सहकारी एडवोकेट माजिद मेमन यांनी 16 वर्षांची राष्ट्रवादीची साथ काल सोडली आहे. त्यासाठी त्यांनी वैयक्तिक कारण दिले आहे, तर कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे आज पंचगंगेच्या काठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यासपीठावर दिसले आहेत.
ए. वाय. पाटील यांनी नुकताच स्वतंत्रपणे मेळावा घेऊन आपल्यावर राष्ट्रवादीत अन्याय होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आजच्या कोल्हापूरच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते एकनाथ शिंदे यांना भेटले आणि त्यांच्यासह व्यासपीठावर बसलेले दिसले. त्यामुळे कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पवारांचा टोला; शिंदेंचा प्रतिटोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आत्मविश्वास नसल्यामुळे ज्योतिषाकडे हात दाखवायला गेले होते, असा टोला शरद पवारांनी लगावला होता. परंतु ज्यांना हात दाखवायचा त्यांना आम्ही 30 जून रोजीच हात दाखवला आहे, असा प्रतिटोला एकनाथ शिंदे यांनी हाणला होता. आता त्यापलिकडे जाऊन हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असे आव्हान त्यांनी कराडच्या सभेत दिले आणि कोल्हापूरच्या सभेत त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे दिसले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष कृतीत राष्ट्रवादीलाच गळती लावल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App