प्रतिनिधी
मुंबई : संजय राऊत, आदित्य ठाकरे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या एक विलक्षण कॉमन फॅक्टर आज दिसला आहे. या चारही नेत्यांनी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे जरूर, पण ही श्रद्धांजली वाहताना त्यांनी हिंदुत्व शब्दाला वगळले आहे. Raut – Aditya – Pawar – Supriya Sule’s tribute to Balasaheb, but excluding Hinduism
जणू हिंदुत्व या शब्दाचा बाळासाहेब ठाकरे यांच्याशी काही संबंधच नाही अशा थाटात त्यांनी बाळासाहेबांपासून हिंदुत्व हा शब्द त्यांनी अलग काढून टाकला आहे. या सर्व नेत्यांच्या आदरांजलीच्या ट्विट भरपूर शब्दफुले आहेत, पण त्यावरचा हिंदुत्वाचा मानाचा तुरा मात्र त्यांनी काढून टाकला आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहताना यह रिश्ता बहुत पुराना है! आपले सगळे आयुष्य तुमच्यासाठी शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी असे म्हटले आहे, तर आदित्य ठाकरे यांनी देखील बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहताना फक्त शिवसेना शिवसेना आणि शिवसेना एवढाच उल्लेख केला आहे. राऊत आणि आदित्य या दोघांच्याही ट्विटमध्ये हिंदुत्व या शब्दाचा उल्लेखही नाही.
जी बात राऊत आणि आदित्य ठाकरे यांची तीच बात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची. शरद पवारांनी बाळासाहेबांचे वर्णन करताना बाळासाहेबांच्या वाणीत लेखणीत आणि कुंचल्यात सामर्थ्य होते. मराठी माणसाच्या हितासाठी त्यांनी संघर्ष केला, असा मराठीचा मुद्दा उचलला आहे, पण त्यांनी हिंदुत्व शब्द वापरलाच नाही. सुप्रिया सुळे यांनी देखील आपले बाळासाहेबांची नाते जुने असल्याचा फोटो शेअर केला आहे बाळासाहेबांना त्यांनी साध्या शब्दांमध्ये श्रद्धांजली वाहिली आहे. त्यात हिंदुत्व शब्दाचा मागमूसही नाही.
वाचा त्यांची ही ट्विट :
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App