प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमुळे खासदार राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष सी व्होटर या संस्थेने सर्वेक्षणातून काढला आहे. मात्र, त्याच वेळी लोकप्रियतेच्या बाबतीत मोदींचे टक्केवारी राहुल गांधी यांच्या पेक्षा कितीतरी पुढे असून मोदींचा तो लीड कायम आहे. राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधींपेक्षा तब्बल 29 % पुढे आहेत, असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून पुढे आला आहे. Rahul Gandhi’s popularity increased as a result of Bharat Jodo Yatra, but Modi’s big lead is certain
राहुल गांधींनी दक्षिणेतील कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा काढली आहे. सध्या ही यात्रा महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात यात्रेचा तब्बल 16 दिवस मुक्काम असून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार आहे. यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या मोठ्या जाहीर सभाही होणार आहेत. दक्षिणेतली 4 राज्ये कव्हर करून ही यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर सी व्होटर या संस्थेने एक सर्वेक्षण केले आहे.
आत्तापर्यंत ही यात्रा ज्या राज्यांमधून गेली आहे, म्हणजेच तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांमध्ये राहुल गांधींची लोकप्रियता अर्थातच अप्रूव्हल रेटिंग वाढले आहे.
तामिळनाडू :
केरळ :
कर्नाटक :
तेलंगण :
गुजरात
हिमाचल प्रदेश
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App