प्रतिनिधी
मुंबई : दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाण्यासाठी रेल्वेने खास नियोजन करून जादा गाड्या सोडण्याचे ठरविले आहे मुंबई ते नागपूर आणि मुंबईपासून कर्नाटक पर्यंत या गाड्या सोडण्याचे नियोजन आहे. Mumbai to Karnataka Mumbai to Nagpur Railway special planning for Diwali
ते पुढीलप्रमाणे :
सणासुदीला प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे विशेष शुल्क आकारून नागपूर ते मुंबई 2 एकेरी विशेष गाड्या चालवणार आहे.
नागपूर ते मुंबई गाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे…
१. नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वन वे स्पेशल
01076 सुपरफास्ट स्पेशल दि. 15.10.2022 रोजी नागपूर येथून 13.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.
थांबे : वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे आणि दादर
२. नागपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस वन वे स्पेशल
01078 सुपरफास्ट स्पेशल दि. 18.10.2022 रोजी नागपूर येथून 13.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 03.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबे : वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, कल्याण आणि ठाणे.
दोन्ही विशेष ट्रेनची संरचना: दोन द्वितीय वातानुकूलित, 8 तृतीय वातानुकूलित, 4 शयनयान, 5 सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये एक गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन.
आरक्षण : वरील विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. 14.10.2022 पासून सर्व PRS स्थानांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू झालेले आहे.
तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
या मार्गावर धावणार विशेष गाड्या
मुंबई- मंगळुरु जंक्शन/मडगाव जंक्शन आणि पुणे – अजनी दरम्यान फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन
मुंबई- मंगळुरु जंक्शन साप्ताहिक विशेष
01185 स्पेशल दि. 21.10.2022 ते 11.11.2022 (4 फेऱ्या) पर्यंत दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 22.15 वाजता सुटेल आणि मंगळुरु जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी 17.05 वाजता पोहोचेल.
01186 स्पेशल दि. 22.10.2022 ते 12.11.2022 (4 फेऱ्या) पर्यंत दर शनिवारी मंगळुरु जंक्शन येथून 18.45 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 11.45 वाजता पोहोचेल.
थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बैन्दूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल.
संरचना : एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, 8 शयनयान, 5 सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामधे दोन गार्ड्स ब्रेक व्हॅन.
२. मुंबई – मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष
01187 स्पेशल दि. 16.10.2022 ते 13.11.2022 (5 फेऱ्या) पर्यंत दर रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 22.15 वाजता सुटेल आणि मडगाव जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी 12.30 वाजता पोहोचेल.
01188 स्पेशल दि. 17.10.2022 ते 14.11.2022 (5 फेऱ्या) पर्यंत दर सोमवारी मडगाव जंक्शन येथून 13.30 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी 23.45 वाजता पोहोचेल.
थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी.
३. पुणे जंक्शन – अजनी सुपरफास्ट साप्ताहिक विशेष
01189 स्पेशल दि. 18.10.2022 ते 29.11.2022 (7 फेऱ्या) पर्यंत दर मंगळवारी पुणे जंक्शन येथून 15.15 वाजता सुटेल आणि अजनी येथे दुसऱ्या दिवशी 04.50 वाजता पोहोचेल.
01190 स्पेशल दि. 19.10.2022 ते 30.11.2022 (7 फेऱ्या) दर बुधवारी अजनी येथून 19.50 वाजता सुटेल आणि पुणे जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी 11.35 वाजता पोहोचेल.
थांबे : दौंड कॉर्ड लाईन, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, नांदुरा, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
संरचना : 13 तृतीय वातानुकूलित आणि दोन जनरेटर व्हॅन
टीप : 01185/01186 आणि 01187/01188 स्पेशल गाड्या 30.10.2022 पर्यंत मान्सूनच्या कालावधीतील वेळापत्रकानुसार आणि दि. 6.11.2022 पासून रोहा आणि मंगळुरू जं./मडगाव दरम्यान गैर-मान्सून नसलेल्या वेळापत्रकानुसार चालतील.
आरक्षण : विशेष गाड्या क्र.01185, 01187/01188 आणि 01189/01190 विशेष शुल्कासह बुकिंग दि. 16.10.2022 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. .
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा असे आवाहन रेल्वेन प्रवाशांना केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App