अंधेरी पोटनिवडणूक : ‘राज पत्र’ चांगल्या भावनेतून, आम्ही विचार करू; फडणवीसांचे सूचक उद्गार

प्रतिनिधी

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरे यांनी चांगल्या भावनेतून पत्र लिहिले आहे. आम्ही त्याचा विचार करू, असे सूचक उदगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत. Raj Patra’ in good spirit, we’ll think; Fadnavis’ suggestive remarks

अंधेरीतील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. ठाकरे – पवार सरकार जाऊन शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर थेट जनतेतून होणारी ही पहिली पोटनिवडणूक आहे. राज ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या काही नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून “माय डियर देवेंद्र” अशा महिन्याचे इंग्रजी स्पेशल रिक्वेस्टचे पत्र लिहिले आहे.

या पत्रात राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा हवाला देत आमदाराच्या निधननंतर तर त्या जागेवर बिनविरोध पोटनिवडणूक करण्याचे आवाहन केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या स्पेशल रिक्वेस्ट ला प्रत्युत्तर दिले आहे. आर. आर. पाटील यांचे निधन झाले, तेव्हा पोटनिवडणूक बिनविरोधच झाली होती. विधान परिषदेच्या बाबतीमध्ये काही पोनिवडणुका बिनविरोध केल्या आहेत.



परंतु अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने आधीच उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. परंतु राज ठाकरे यांनी चांगल्या भावनेतून पत्र लिहिले आहे. त्याचा नक्की विचार करू. पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून मग निर्णय घेऊ असे सूचक उद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत.

या वक्तव्यातून फडणवीसांनी अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे सूतोवाच केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मोठा राजकीय संघर्ष करून शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट – एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांची सव्वा लाखाची राजकीय मुठ झाकलेलीच राहणार आहे!!

Raj Patra’ in good spirit, we’ll think; Fadnavis’ suggestive remarks

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात