प्रतिनिधी
मुंबई : मुंबईसह 16 महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे, इतकेच नाही तर स्वतः अमित ठाकरे देखील स्वतः निवडणूक लढवू शकतात असे त्यांनीच म्हटले आहे. या राजकीय पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षावर जाऊन भेट घेतली आहे. Raj Thackeray’s discussion with Chief Minister Eknath Shinde for the third time
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांच्याशी झालेली ही तिसरी भेट आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थावर जाऊन त्यांना भेटले होते. त्यानंतर गणेशोत्सवात राज ठाकरे यांनी आपल्या कुटुंबीयांसह वर्षा बंगल्यावर येऊन गणपतीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर तिसऱ्यांदा राज ठाकरे यांनी वर्षावर येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. या चर्चेच्या वेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा हे दोन नेते उपस्थित होते. आरोग्य विषयक प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली असे सांगितले जात आहे.
Raj Thackeray : मनसैनिकांसाठी इम्युनिटी डोस सभा!!
परंतु एकीकडे मनसे मुंबई सह 16 महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी करत असताना तसेच अमित ठाकरे यांनी निवडणुकीच्या मैदानात स्वतः उतरण्याची तयारी दाखवली असताना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणे याला राजकीय दृष्ट्या विशेष महत्त्व आहे. या चर्चेतून नेमकी कोणती रणनीती ठरते??, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीशी या चर्चेचा काही संबंध आहे का??, हे त्या पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लक्षात येईल. पण मुंबईसह 16 महापालिका निवडणुकांची ठाकरे + शिंदे चर्चेचा काही संबंध असू शकतो. एक वेगळ्या प्रकारचे “स्ट्रॅटेजिक अलायन्स” किंवा “स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप” दोघांच्या भेटीमुळे पुढे येऊ शकते अशी राजकीय वर्तुळात प्रामुख्याने चर्चा आहे.
अर्थात या सर्व माध्यमांनी बांधलेल्या अटकळी आहेत राज ठाकरे किंवा एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांपैकी कोणीही वर्षावरील भेटी संदर्भात कोणतीही राजकीय माहिती दिलेली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App