वृत्तसंस्था
पाटणा : मणिशंकर ते ललनसिंह : विरोधकांची विरोधकांनी मोदींची जात काढली आणि गुजरातची लढाई जातीवर आणली. हे घडले आहे 2022 मध्ये बिहारची राजधानी पाटण्यात!!Opposition leaders targets PM Narendra Modi on caste, bringing the whole election affair to castism
पाटणामध्ये भाजपचे काही कार्यकर्ते आणि नेते मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलात आले आणि त्यांचे स्वागत करताना संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ललन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जात काढली. आपली सगळी भडास मोदींवर काढताना लालसिंह म्हणाले, की 2014 मध्ये मोदी स्वतःला अतिपिछडा म्हणून घेत होते. सगळीकडे तसा प्रचार करत होते. पण गुजरात मध्ये अति पिछडावर्ग आहे का?? गुजरात मध्ये फक्त पिछडावर्ग आहे. मोदी तर पिछडा वर्गातही पण नव्हते. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या समाजाला पिछडा वर्गात जोडून घेतले आणि स्वतःचा प्रचार अति पिछडा असा करू लागले. ते तर डुप्लिकेट ओबीसी आहेत.
ललन सिंह यांनी मोदींची अशी जात काढून गुजरातची लढाई जातीवर आणली आहे. पण ललन सिंह हे काही एकटेच विरोधी पक्षांचे नेते नव्हेत, की ज्यांनी पंतप्रधान मोदींवर जातीवर आधारित अश्लाघ्य टिप्पणी करून शरसंधान साधले आहे. यापूर्वी काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी देखील मोदींना “नीच” असा शब्द वापरून त्यांच्या जाती विषयी अभद्र टिप्पणी केली होती. 2017 च्या विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मणिशंकर अय्यर यांनी मोदींची “नीच” या शब्दात संभावना करून त्यांना त्यांच्या जातीचा उल्लेख केला होता. त्यावरून गुजरात मध्ये मोठे राजकीय रणकंदन माजले होते. गुजरातची विधानसभा निवडणूक त्यावेळेला भाजपने जिंकली होती.
2022 ची विधानसभा निवडणूक जवळ येत असताना पाटण्यामध्ये ललन सिंह यांनी 2017 च्या इतिहासाची पुनरावृत्ती करत मोदींची जात काढली आहे. इतकेच नव्हे, तर त्यांना डुप्लिकेट ओबीसी असे संबोधन गुजरातच्या निवडणुकीत जातीचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. भाजपने ललन सिंह यांना त्यांच्याच भाषेत चौक प्रत्युत्तर दिले आहे. पण विधानसभा निवडणूक जवळ येताना गुजरातमध्ये जातीचा मुद्दा मात्र ऐरणीवर आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App