गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची आज घोषणा; गुजरात मध्ये त्रिकोणी, हिमाचलमध्ये द्विपक्षीय संघर्ष

प्रतिनिधी

नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका आज घोषित होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी 3.00 वाजता पत्रकार परिषद होणार असून या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करेल. Gujarat, Himachal Pradesh assembly elections announced today

आम आदमी पार्टीची एन्ट्री

2024 च्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली गेलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत राज्याच्या इतिहासात प्रथमच त्रिकोणी संघर्ष होणार आहे. सत्ताधारी भाजप – काँग्रेस आणि आम आदमी पार्टी स्वतंत्रपणे एकमेकांशी संघर्ष करणार आहेत. पंजाब विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर आम आदमी पार्टीचा राजकीय आत्मविश्वास वाढला आहे आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये आपण यशस्वी टक्कर दिली, तर देशपातळीवर मोदींच्या पर्यायी नेतृत्व म्हणून आपली प्रतिमा उंचावेल, असा अरविंद केजरीवाल यांचा राजकीय होरा आहे.


Gujrat Congress : राहुल गांधींच्या दाहोद दौर्‍यात हार्दिक पटेलची नाराजी दूर!!


केजरीवाल इतर प्रादेशिक नेत्यांना भारी

देशभरात अनेक प्रादेशिक पक्षांचे नेते आपापले राजकीय नशीब केंद्रीय पातळीवर आजमावत असताना ते फक्त परसेप्शनच्या पातळीवर खेळत आहेत. तेलंगणा मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव आपल्या पक्षाचे तेलंगण राष्ट्र समितीचे नामकरण भारतीय राष्ट्र समिती असे करून राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा जाहीर केली आहे, पण तेलंगण वगळता त्यांना अन्य राज्यांमध्ये राजकीय यश अद्याप मिळालेले नाही. अरविंद केजरीवाल हे एकमेव प्रादेशिक पक्षाचे नेते आहेत की ज्यांना दिल्ली सोडून पंजाब सारख्या एका मोठ्या राज्यामध्ये निवडणुकीत यश मिळाले आहे. त्यामुळे पंजाब नंतर आता अरविंद केजरीवाल गुजरात मध्ये दमदार राजकीय शिरकाव करू इच्छित आहेत. आम आदमी पार्टीच्या गुजरात मधल्या राजकीय शिरकावामुळे पारंपरिक दृष्ट्या भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष असलेल्या या राज्यात त्रिकोणी संघर्ष होतो आहे.

हिमाचलमध्ये मोदींचे दौरे

हिमाचल प्रदेश मध्ये मात्र भाजप विरुद्ध काँग्रेस असाच संघर्ष राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशचे दोन दौरे केले आहेत. त्यांचा आणखी एक दौरा नियोजित आहे. त्यातला कालचा 13 ऑक्टोबर 2022 चा चंबा दौरा हा तर देशाच्या पंतप्रधानांचा 1981 नंतरचा पहिला दौरा होता. हिमाचल प्रदेशातल्या युवकांना रोजगारासाठी राज्याबाहेर जावे लागणार नाही, याची व्यवस्था करण्याचे आश्वासन मोदींनी दिले. 16 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींचा आणखी एक हिमाचल दौरा अपेक्षित आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी भारत जोडो यात्रेत दक्षिण भारताच्या प्रवासात आहेत निवडणुका जाहीर झाल्यानंतर कदाचित ते हिमाचल आणि गुजरात मध्ये दौरा करू शकतात.

Gujarat, Himachal Pradesh assembly elections announced today

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात