वृत्तसंस्था
सुरत : गुजरातमधील सुरत शहरामध्ये पोलिसांना बनावट नोटांचा मोठा साठा सापडला आहे. कामरेज पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी खब-यांच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे ही करवाई केली. या नोटांचे मुल्य 25 कोटी 80 लाख रुपये इतके आहे.|Reverse Bank Fake 2000 notes worth Rs 25 crore seized
गुजरात पोलीस दलातील ग्रामीण विभागाचे अधिक्षक हितेश जोसर यांनी या कारवाईसंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. मुंबई- अहमदनगर मार्गावरुन मोठ्या प्रमाणात चलनी नोटा नेल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या मार्गावरुन जाणा-या एका रुग्णवाहिकेला चेकपोस्टवर अडवले आणि तपासणी केली असता त्यांना रुग्णवाहिकेमध्ये चलनी नोटांच्या सहा मोठ्या पेट्या आढळून आल्या.
रुग्णवाहिकेच्या मागच्या बाजूला ठेवलेल्या सहा कंटेनरमधील 1 हजार 290 पाकिटांमध्ये 2 हजार रुपयांच्या चलनी नोटा पोलिसांना सापडल्या. या नोटांचे मूल्य 25 कोटी 80 लाख इतके असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या नोटांवर रिझर्व्ह बॅंकेऐवजी रिव्हर्स बॅंक असे छापण्यात आले होते.बॅंकेच्या अधिका-यांकडे आणि फाॅरेन्सिक टीमकडे या नोटा पाठवण्यात आल्या आहेत. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App