प्रतिनिधी
एर्नाकुलम (केरळ) : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा प्रत्यक्षात भारत जोडण्यापेक्षा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. सुरुवातीलाच हिंदू हेट स्पीच देणारे ख्रिस्ती धर्मगुरू जॉर्ज पोन्नया यांची भेट राहुल गांधी यांनी घेऊन यात्रे संदर्भातल्या वादाला सुरुवात केली. त्यानंतर या यात्रे संदर्भात दररोज काही ना काहीतरी वाद उद्भवतच आहेत. Photo of Savarkar in Kerala during the Bharat Jodo Yatra of Congress
पण आता केरळमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत जुनाच वाद पुन्हा उद्भवला आहे. कारण एर्नाकुलम विमानतळाजवळ काँग्रेसच्या बॅनरवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो छापला आहे. सावरकरांचा फोटो छापल्याचे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या लक्षात येतात नेत्यांची धावपळ उडाली आणि सावरकरांचा फोटो काँग्रेसच्या बॅनर वर लावणे ही डीटीपी वाल्याची “प्रिंटिंग मिस्टेक” आहे, असे सांगत सावरकरांच्या फोटोवर महात्मा गांधींचा फोटो चिकटवण्याचा “उद्योग” काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. पण हे सगळे सोशल मीडियामुळे उघड्यावर आले!!
Veer Savarkar Pic in Congress Bharat Jodo yatra pic.twitter.com/nQafNJ26iy — Tajinder Bagga (Modi Ka Parivar) (@TajinderBagga) September 21, 2022
Veer Savarkar Pic in Congress Bharat Jodo yatra pic.twitter.com/nQafNJ26iy
— Tajinder Bagga (Modi Ka Parivar) (@TajinderBagga) September 21, 2022
भारत जोडो यात्रा काढणारे खासदार राहुल गांधी हे सावरकरांना नेहमी पाण्यातच पाहत आले आहेत. मी “राहुल गांधी” आहे, “राहुल सावरकर नाही”, असे ते जाहीर भाषणात म्हणाले आहेत. त्यावरून भाजप आणि काँग्रेस यांच्या जोरदार घामासान देखील झाले आहे. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने सावरकरांचा फोटो काँग्रेसच्या बॅनर वर छापल्यानंतर, चला राहुल गांधी यांच्या काँग्रेसला उशिरा का होईना पण “जाग” आली, असे शरसंधान भाजपचे नेते अमित मालवीय, तेजींदर बग्गा आदी अनेक नेत्यांनी साधून घेतले. राहुल गांधी किती नाकारू देत शेवटी इतिहासाने हे सिद्ध केलेच, की सावरकर “वीर” होते असा टोला शहजाद पूनावाला यांनी लगावला.
भाजपच्या नेत्यांकडून असे “कॉर्नर” झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांना “जाग” आली आणि त्यांनी सावरकरांचा फोटो काँग्रेसच्या बॅनर वर छापणे ही “प्रिंटिंग मिस्टेक” असल्याची मखलाशी केली. तर काही कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या त्या फोटोवर महात्मा गांधींचा फोटो चिकटवण्याचा प्रयत्न केला. पण ही प्रिंटिंग मिस्टेक असो अथवा अन्य काही… काँग्रेसची भारत जोडो यात्रा राहुल गांधींपेक्षा केरळ प्रांतात तरी सावरकरांमुळेच गाजली!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App