वृत्तसंस्था
नवी दिल्ली : चीनच्या दादागिरीमुळे करू नका अनेक देशांनी चीनला बॉयकॉट केले होते. त्यामुळे भारतासह जगभरातील अनेक देशांनी चीनवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात अग्रेसर असलेल्या चीनला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. After Apple, Google will also come to India from China
अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी आपले प्रकल्प चीनमधून इतर देशांत हलविले आहेत. अॅपलने चीनमधील आपली कंपनी भारतात हलवण्याची तयारी सुरू केली असतानाच आता गुगल देखील चीनमधील आपले बस्तान उठवून ते भारतात हलवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार
गुगल आपले मॅन्युफॅक्चरिंग असेंब्ली युनिट चीनमधून भारतात हलण्यासाठी सज्ज असल्याचे सांगण्यात येत आहे. नुकतीच फॉक्सकॉन ही सेमीकंडक्टर बनवणारी कंपनी भारतात आली आहे. त्यावरुन महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमध्ये वाद सुरू असताना आता गुगल भारतात येण्याची बातमी समोर येत आहे. चीनवर असलेल्या निर्बंधांमुळे अनेक टेक कंपन्या या भारत आणि इतर देशांत येण्यासाठी इच्छुक आहेत. यामुळे भारतात गुंतवणुकीसोबतच तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पिक्सल फोन बनवणार
गुगल भारतात पिक्सल स्मार्टफोन बनवणार आहे. यासाठी गुगलने भारतीय उत्पादकांकडून 10 लाख पिक्सेल स्मार्टफोन तयार करण्यासाठी बोली सादर करण्याची घोषणा केली आहे. एकूण स्मार्टफोन उत्पादनांपैकी 10 ते 20 टक्के उत्पादन गुगल भारतात घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी पिक्सलचे सर्वाधिक उत्पादन हे चीनमध्ये होत होते.
सरकारच्या योजनेचा फायदा
देशात स्मार्टफोन निर्मितीला चालना देण्यासाठी भारत सरकारने PLI(Production Linked Initiative)ही योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे भारत मोबाईल उत्पादन केंद्र म्हणून नावारुपाला येणार आहे. जगभरात प्रसिद्ध असलेले अॅपलचे आयफोन 14 सोडून इतस सर्व आयफोन हे भारतात असेंबल होत असल्याचे सांगण्यात येते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App