प्रतिनिधी
नवी दिल्ली : वाराणसीत ज्ञानवापी मंदिराच्या मुक्तीतील पहिला अडथळा पार झाला आहे. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष वरिष्ठ विधिज्ञ आलोक कुमार यांनी ज्ञानवापी खटला हा सुनावणीस पात्र असल्याचे मानण्याच्या वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे.Vishwa Hindu Parishad : Gnanavapi Temple Crosses First Hurdle to Liberation; Decision Satisfactory!!
आलोक कुमार म्हणाले, की वाराणसीचा खटला प्लेसेस ऑफ वर्शिप एक्ट 1993 च्या अंतर्गत येत नाही, याबद्दल त्यांना आधीही विश्वास होता. केवळ खटला लांबविण्यासाठी प्रतिवादींनी याचिका केली होती. आता याचिका रद्द झाल्यामुळे या खटल्याची सुनावणी गुण-दोषांच्या आधारे होईल.
या दाव्यात हिंदू पक्षाचा विजय होईल, याची पूर्ण आशा होती. न्यायालयाच्या निर्णयाला हार-जीतीचा मुद्दा न करता स्वीकार करावा, कारण हा एक धार्मिक आणि आध्यात्मिक विषय आहे, असे आवाहन त्यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App