सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी दिली अखिल भारतीय समन्वय बैठकीची माहिती
प्रतिनिधी
रायपूर (छत्तीसगड) : स्थानिक वस्तूंच्या विक्रीला प्रोत्साहन अर्थात व्होकल फॉर लोकल तसेच जीडीपी पलीकडच्या विकेंद्रीत अर्थव्यवस्थेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कटिबद्ध असल्याचा निर्वाळा रायपूर येथे झालेल्या अखिल भारतीय समन्वय समितीच्या बैठकीत देण्यात आला.Vocal for Local, Sangh Committed for Decentralized Economy beyond GDP!!
तीन दिवसीय अखिल भारतीय समन्वय बैठक 2022 ची माहिती सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, की भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संघप्रेरित सगळ्याच विविध संघटनांनी देशाचे स्वत्व जागृत करण्याच्या कार्याला विस्तार देण्याबाबत चर्चा केली.
त्यांनी सांगितले, की बैठकीत ग्राहक पंचायतीने स्थानिक वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी विकेंद्रीत अर्थव्यवस्थेवर भर देण्याचा मुद्दा मांडला, तर स्वदेशी जागरण मंचाने भारतीय अर्थव्यवस्थेचे मोजमाप करण्यासाठी केवळ जीडीपी हे प्रमाण न मानता एक नवीन मोजमाप प्रणाली बनविण्याचा विचार मांडला.
त्याच बरोबर भारतीय किसान संघाने जैविक कृषीला प्रोत्साहन देण्याबाबत विचार मांडले. भारतात केवळ शारीरिक रोगांच्या उपचाराचा विषय नाही. भारतीय उपचार प्रणालीसुद्धा परिष्कृत आणि प्रगत आहे. वर्तमान परिस्थितीत आरोग्य भारतीने संपूर्ण उपचार पद्धतीचा अंगीकार करण्याचा विचार मांडला आणि त्यावर कार्य करण्याबाबत आपले मत मांडले. देशात स्वभाषेला प्रशासनात सन्मान करण्यासाठी न्यायपालिकेच्या कार्यप्रणालीत भारतीय भाषेचा वापर करण्याबाबत विचार झाला.
डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले, की देश-परदेशात संघकार्य वाढत आहे. कोविड संक्रमणाच्या थोडा कमजोर झाला होता. आता पुन्हा शाखांमध्ये वाढ झाली आहे. ते म्हणाले, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रेरित झालेल्या 36 संघटना समाजात कार्य करत आहेत. त्या सगळ्या स्वायत्त आणि स्वतंत्र आहेत. त्यामुळे या समन्वय बैठकीत कोणताही निर्णय होत नाही, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते.
ते पुढे म्हणाले, की स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाले आहेत. या उत्सवात संघाच्या निरनिराळ्या संघटनांनी आपले योगदान दिले आहे. शैक्षणिक महासंघाच्या 2 लाख विद्यार्थ्यांनी कार्यक्रम केला. संस्कार भारतीने वंदे मातरम् गायन केले. संपूर्ण देशात 75 नाटकांचे मंचन झाले. अशा प्रकारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने 87 हजारांपेक्षा अधिक ठिकाणी तिरंगा फडकावला. ते म्हणाले, की स्वातंत्र्यसंग्रामात संपूर्ण देशाच्या सर्व भागांतील, सर्व वर्गांचा सहभाग राहिला आहे. भारताचा स्व, स्वातंत्र्य, स्वदेशी, स्वराज यात एक समान शब्द आहे. समन्वय बैठकीत सर्वांना जोडणाऱ्या स्वला प्रगट करण्याबाबत चर्चा झाली. भारताचे तत्त्व आध्यात्मिकता आहे. याच्यावर आधारित जीवनपद्धतीने सर्वांच्या जीवनाला प्रभावित केले आहे. ईश्वर एक आहे, मार्ग वेगवेगळे आहेत. सर्वांचे सत्य स्वीकार्य आहे. भारतात एक संस्कृती आगे ती विविधतेचा उत्सव साजरा करते.
वैद्य यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची आठवण सांगितली. रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते, राजा, सत्तेकडे संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी नव्हती. केवळ सेना, परदेश नीती, प्रशासन ही राजाची जबाबदारी होती. बाकीच्या कार्याची जबाबदारी समाज पार पाडत होता. समाजाचे हे तत्त्व आपण कोविड काळातही पाहिले आहे. लाखो लोकांनी बाहेर निघून एकत्र येत काम केले. अशाच प्रकारे भारतात भौतिक समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती एकत्र साधणे हेच जीवन आहे. वरील तिन्ही मिळून भारताचे स्वत्व कसे प्रगट होईल, यावरही चर्चा झाली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठक 2022 च्या बैठकीत संघ विचारांशी जोडलेल्या 36 संघटनांच्या 240 पेक्षा अधिक प्रमुख प्रतिनिधींनी भाग घेतला. या बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले यांचे मार्गदर्शन लाभले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App