वृत्तसंस्था
लंडन : ब्रिटनवर दीर्घकाळ राज्य करणाऱ्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ९६ वर्षीय एलिझाबेथ यांनी स्कॉटलंडच्या बालमोरा कॅसलमध्ये अखेरचा श्वास घेतला. याआधी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले होते. प्रकृती सुधारत नसल्याचे पाहून नातेवाइकांना बोलावण्यात आले होते.Maharaja era begins in Britain now: After the death of his mother, Prince Charles became the new king of Britain, his wife will get the crown of Kohinoor
महाराणीचे अधिकृत निवासस्थान बकिंगहॅम पॅलेसने भारतीय वेळेनुसार ११.१५ वाजता निधनाची घोषणा केली. यासोबत त्यांचा मोठा मुलगा ७४ वर्षीय प्रिन्स चार्ल्सना नवे राजे आणि राज्य प्रमुख केले. चार्ल्स १४ राष्ट्रकुल क्षेत्रांचे राजे असतील. त्यांना चार्ल्स ३ संबोधले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील अनेक नेत्यांनी महाराणीच्या निधनाबाद्दल दु:ख व्यक्त केले.
7 शतकांची सम्राज्ञी, 15 पंतप्रधानांना दिली शपथ
एलिझाबेथ यांनी 15 पंतप्रधानांची नियुक्ती केली. त्यांच्या राज्याभिषेकावेळी विन्स्टन चर्चिल पंतप्रधान होते. 1955 मध्ये त्यांनी अँथनी एडन यांना पहिले पंतप्रधान नियुक्त केले आणि मंगळवारी 15व्या पीएम लिज ट्रस यांची नियुक्ती केली.
लहानपणी लाजाळू होत्या एलिझा
राणी एलिझाबेथ लहानपणी लाजाळू होत्या. वयाच्या 6व्या वर्षी शिक्षकाने सांगितले होते की, गावची मुलगी होऊ इच्छिते आणि अनेक घोडे-श्वान पाळू इच्छिते. 1936 मध्ये मोठे चुलते एडवर्ड यांनी घटस्फोटित अमेरिकी महिलेशी लग्न करण्यासाठी राजा होण्यास नकार दिला होता. यानंतर एलिझाबेथ 2 जून 1953 रोजी 27व्या वर्षी ब्रिटनच्या राणी झाल्या.
ब्रिटनच्या राणीच होते दोन वाढदिवस
महाराणींचा वाढदिवस 21 एप्रिल व जूनच्या कुठल्याही एका शनिवारी साजरा केला जात होता. जूनमध्येच त्यांचा राज्याभिषेक झाला होता.
त्यांनी पासपोर्टविना जगातील 128 पेक्षा जास्त देशांचा दौरा केला होता. महाराणींनी आयुष्यात फक्त एकदा 2008 मध्ये बीबीसीला मुलाखत दिली होती.
चार्ल्स यांच्या पत्नी कॅमिला आता राणी, कोहिनूरचा मुकुट मिळणार
नवे राजे चार्ल्स यांची पहिली पत्नी डायना होती. चार्ल्स राजे झाल्यानंतर आता त्यांची दुसरी पत्नी कॅमिलाला महाराणीचा प्रसिद्ध कोहिनूर हिऱ्यांचा मुकुट मिळेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App