प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार जाऊन शिंदे – फडणवीस सरकार आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात “अधिक” लक्ष घालायला गेले आणि त्यांच्याच राष्ट्रवादीचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष फुटले. अशी अवस्था आज राष्ट्रवादीची आली आहे. Navi Mumbai NCP president split, Shinde joins group
शरद पवार यांनी नुकताच ठाण्याचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत ठाण्यात पूर्वी सुसंस्कृत नेतृत्व कसे होते, याची काही उदाहरणे सांगितली होती. या उदाहरणांमधून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांची नावे वगळली होती. त्याचवेळी ते ठाण्यामध्ये जुने राजकीय वैभव परत आणण्यासाठी आपण अधिक लक्ष घालू, असे ते म्हणाले होते. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व जितेंद्र आव्हाड करतात. शरद पवारांच्या ठाणे दौऱ्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना राजकीय बूस्टर डोस मिळण्याची अपेक्षा होती.
परंतु त्यांना तसा राजकीय बूस्टर डोस मिळण्याऐवजी नवी मुंबईतलेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अशोक गावडे आता फुटून शिंदे गटात सामील झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देताना त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार शशिकांत शिंदे या दोन राष्ट्रवादीच्या नेत्यांवर शरसंधान साधले आहे. आव्हाड आणि शिंदे तसेच राष्ट्रवादीत बाहेरून आलेल्या उपऱ्या नेत्यांचा हस्तक्षेप वाढत असल्याने कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोन वर्षांपूर्वीपासून आपण राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे उपऱ्या नेत्यांच्या हस्तक्षेपाविरोधात तक्रारी करत आहोत. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर विष्णुदास भावे सभागृहात राष्ट्रवादीच्या मेळाव्यातही हे मी सांगितले होते. परंतु राजकीय परिस्थितीमध्ये काही सुधारणा झाली नाही. उपऱ्या नेत्यांचा हस्तक्षेप कमी झाला नाही म्हणून कंटाळून पक्ष सोडत असल्याचे अशोक गावडे म्हणाले आहेत. शरद पवार यांच्या विषयी आदर होता आणि यापुढेही राहील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे.
पण एकूण शरद पवार हे ठाण्याच्या दौऱ्यावर येऊन ठाणे परिसरात राष्ट्रवादी वाढीसाठी “अधिक” लक्ष घालायला गेले आणि त्यांच्याच पक्षाचा नवी मुंबईच्या शहराध्यक्ष फुटले असे घडले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App