मुस्लिम युवतीवर प्रेम केल्याने दीपक बर्डे या भिल्ल आदिवासी युवकाचा खून करण्याचा हेतूने अपहरण!! Abduction of tribal youth married to Muslim girl
प्रतिनिधी
नगर : श्रीरामपूर तालुक्यातील भोकर गावातील घटना… भिल्ल आदिवासी युवक दीपक बर्डे याने सानिया शेख सोबत महिनाभरापूर्वी प्रेम विवाह केला होता. आता सानियाच्या घरच्यांनी आणि नातेवाईकांनी दीपकचा खून करण्याचा हेतूने अपहरण केले आहे. खून केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. ३१ ऑगस्ट पासून दीपक बेपत्ता आहे.
पोलिसांनी संबंधित आरोपींवर खुनाच्या हेतूने अपहरण आणि ऍट्रोसिटीचे कलम लावलेले आहे. दीपक बर्डे याच्या वडिलांनी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात मजनू शेख, इम्रान अब्बास अजीज शेख, राजू शेख, समीर शेख अशा 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. पोलिस आता आदिवासी युवक दीपक बर्डे याचा शोध घेत आहेत.
या घटनेचे वर्णन काही मराठी माध्यमांनी नवा सैराट असे केले आहे. परंतु, या बातमीमध्ये केवळ दीपक बर्डे याचे नाव असून आरोपींची नावे देणे टाळले आहे. पण पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली आहे.
ही अतिशय गंभीर घटना असून यामुळे समाजात असंतोष निर्माण झालेला आहे. पोलिसांनी दीपकच्या कुटुंबीयांना संरक्षण द्यावे. दीपक चा शोध घ्यावा. या घटनेचा सखोल तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी आम्ही करतो आहे, महाराष्ट्रातील विवेक विचार मंचाने केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App