वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना उच्च न्यायालयाने २५ ऑगस्टपर्यंत जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तूर्त तरी त्यांना अटक करता येणार नाही. आपल्या प्रक्षोभक भाषणातून देशातील जनतेला सरकार, न्यायाधीशांच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे.Govt, relief to Imran Khan who threatened judge; Bail granted till August 25
या प्रकरणात इम्रान यांच्या विरोधात दहशतवाद प्रतिबंधक कायद्यांतर्गत वारंट काढण्यात आले आहे. इस्लामाबादमध्ये २० ऑगस्ट रोजी एका जाहीर सभेत इम्रान यांनी महिला न्यायाधीश, पोलिस अधिकाऱ्यांनाही जाहीरपणे धमकी दिली होती. परंतु इम्रान यांना अटक केल्यास ही कृती लाल रेषा ओलांडण्यासारखी ठरेल, असा इशारा विरोधी पक्षाने दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App