वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयने छापे घातले आहेत. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळी 20 ठिकाणी छापे घातले आहेत. याबद्दल खुद्द सिसोदिया यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे. सीबीआयचे आमच्या घरी “स्वागत” आहे. चौकशीत आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू, जेणे करुन सत्य लवकरच सर्वांसमोर येईल. आतार्यंत माझ्यावर अनेक केसेस करण्यात आल्या आहेत. पण त्यातून काहीही बाहेर आले नाही. मला पूर्ण विश्वास आहे की या छाप्यांमधूनही काहीच साध्य होणार नाही. मी मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी प्रयत्नशील आहे आणि त्याला कुणीही रोखू शकत नाही, असा दावा सिसोदिया यांनी ट्विटमधून केला आहे.Arbitrary changes in excise duty policy; CBI raids 20 places of Delhi Deputy Chief Minister Manish Sisodian!!
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील सिसोदिया यांच्यासारखेच ट्विट करून त्यांना पाठिंबा दिला आहे.
सीबीआय चौकशीची शिफारस
दिल्लीच्या उपराज्यपालांनी गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध दिल्लीच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणातील अनियमिततेच्या आरोपावरुन सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. नवीन उत्पादन शुल्क धोरण नियमांचे उल्लंघन करुन, त्यांच्या इच्छेनुसार तयार करण्याचे, अंमलबजावणी करण्याचे आणि त्यात मनमानी बदल करण्यासाठी कोणकोणत्या सरकारी अधिकारी आणि प्रशासकांनी मुख्य भूमिका बजावली याचा माहितीचा अधिकार अहवाल सादर करण्याचे निर्देश उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी मुख्य सचिव नरेश कुमार यांनी दिले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App