वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय सैन्यदलाच्या वतीने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC)मध्ये अधिकारी भरतीसाठी अधिसूचना काढली आहे. या अंतर्गत SSC (60 वी पुरुष) आणि SSC (31 वी महिला) अशा 189 तांत्रिक पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये 175 पदांसाठी पुरुष तर 14 जागांसाठी महिला उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी 20 ते 27 वर्षे वयोगटातील उमेदवार 24 ऑगस्ट पर्यंत SSC च्या अधिकृत संकेतस्थळावर joinindianarmy.nic.in जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.Indian Army Officer Vacancy Age Limit 20 to 27, Apply by 24th August, Salary upto 1.77 Lakhs
रिक्त जागा किती?
स्थापत्य अभियांत्रिकी (बांधकाम) – 49 पद संगणक विज्ञान – 42 पद इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स विंग – 17 पद इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी – 26 पद मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल – 32 पद रिमोट सेन्सिंग/प्लास्टिक टेक – 9 पद
काय आहे पात्रता?
अभियांत्रिकी क्षेत्रात पदवी अभ्यासक्रम केलेले सर्व उमेदवार. किंवा अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी. असे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
किती असेल वेतन?
भरती प्रक्रियेत निवड झाल्यानंतर उमेदवाराला वेतन-स्तर-10 अंतर्गत दरमहा रुपये 56,100 ते 1 लाख 77,500 रूपये पगार दिला जाईल. तर प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना दरमहा 56,100 रूपये मानधन दिले जाते.
काय आहे वयोमर्यादा?
189 पदांसाठी भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2023 रोजी 20 ते 27 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.
असा करा अर्ज
भारतीय सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळ www.joinindianarmy.nic.in वर ‘Officer Entry Appln/Login’ या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर नोंदणी फॉर्म भरा. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, ‘ऑनलाइन अर्ज करा’ या लिंकवर क्लिक करा. येथे ‘अधिकारी निवड – ‘पात्रता’ पृष्ठ उघडेल. सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. तुम्ही अर्ज नोंदणी क्रमांक देखील ठेवू शकता आणि फॉर्मची प्रिंट आउट देखील करू शकता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App