विनायक ढेरे
एकीकडे नॅशनल हेराल्ड केस मध्ये दिल्लीतले यंग इंडियाचे कार्यालय सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने सील केले असतानाच दुसरीकडे राहुल गांधी मात्र टेम्पल रन च्या पलीकडे जात आज लिंगदीक्षा घेते झाले. लिंगायत धर्मगुरूंकडून त्यांनी इष्टलिंग बांधून घेतले आहे. Sri Jagadguru Murugharajendra Vidyapeetha and receive the ‘Ishtalinga Deekshe’ from Dr. Sri Shivamurthy Murugha Sharanaru.
जानवेधारी ब्राह्मण ते लिंगदीक्षा
2019 च्या लोकसभा आणि नंतरच्या विधानसभा निवडणूक काळामध्ये राहुल गांधी शहरा शहरांमध्ये आणि गावागावांमधल्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन आणि आशीर्वाद घेत होते. इतकेच नव्हे तर त्यांनी आपण दत्तात्रय गोत्री जानवेधारी ब्राह्मण असल्यासही म्हटले होते. परंतु आता आजच्या कर्नाटक दौऱ्यात त्यांनी चित्रदुर्ग मधील मुरुगा मठाला भेट देऊन लिंगायत धर्मगुरूंकडून लिंगदीक्षा घेतली आहे आणि इष्टलिंग बांधून घेतले आहे. त्यामुळे ते आता इथून पुढे लिंगायत पंथाचे अनुयायी मानले जातील. लिंगायत धर्मगुरू डॉ. शिवमूर्ती मुरुगा शरणारू यांनी त्यांना इष्टलिंग बांधताना पंतप्रधान होण्याचे आशीर्वाद दिले आहेत. राहुल गांधींच्या आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी पंतप्रधान होते. त्यांच्याप्रमाणेच तुम्ही पण पंतप्रधान व्हाल, असा आशीर्वाद धर्मगुरू डॉ. शिवमूर्ती मुरुगा शरणारू यांनी राहुल गांधींना दिला आहे.
सिद्धरामय्यांचा 75 वा वाढदिवस
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आज 75 वा वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त राहुल गांधींनी आज कर्नाटकचा दौरा केला. आपण सहसा कोणत्या वाढदिवसाला हजर राहत नाही पण सिद्धरामय्या यांच्याशी आपले वेगळे नाते असल्यामुळे त्यांच्या 75 व्या वाढदिवसाला आपण हजर राहिलो असे राहुल गांधींनी आवर्जून सांगितले. आणि त्यानंतर त्यांनी चित्रदुर्ग मधील मुरुगा मठाला भेट दिली. तिथल्या धर्मगुरूंची चर्चा केली. बसवण्णांबद्दल मी वाचन केले आहे. मला लिंगायत पंथाविषयी आणखी माहिती हवी आहे. ती कोणी देऊ शकेल का?, असे त्यांनी धर्मगुरूंना विचारले. त्यानंतर धर्मगुरूंनी त्यांना लिंगदीक्षा देऊन इष्टलिंग बांधले. लिंगायत पंथाचे अनुयायी आपल्या गळ्यात इष्टलिंग बांधतात आणि कोणतेही कर्म करताना त्यावर आपला उजवा हात ठेवून शपथबद्ध होत असतात.
It is an absolute honour to visit Sri Jagadguru Murugharajendra Vidyapeetha and receive the 'Ishtalinga Deekshe' from Dr. Sri Shivamurthy Murugha Sharanaru. The teachings of Guru Basavanna are eternal and I am humbled to learn more about it from the Sharanaru of the Math. pic.twitter.com/5Dgj53roSp — Rahul Gandhi (@RahulGandhi) August 3, 2022
It is an absolute honour to visit Sri Jagadguru Murugharajendra Vidyapeetha and receive the 'Ishtalinga Deekshe' from Dr. Sri Shivamurthy Murugha Sharanaru.
The teachings of Guru Basavanna are eternal and I am humbled to learn more about it from the Sharanaru of the Math. pic.twitter.com/5Dgj53roSp
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 3, 2022
राहुलजींच्या लिंगदीक्षेचा राजकीय अर्थ
राहुल गांधींनी लिंगदीक्षा घेणे आणि इष्टलिंग बांधून घेणे याला कर्नाटकातील लिंगायत समाजाच्या दृष्टीने वेगळा राजकीय अर्थ देखील आहे. लिंगायत समाज आणि त्याचे काही धर्मगुरू स्वतःला हिंदूंपासून वेगळे मानतात. लिंगायत हा हिंदू धर्मापेक्षा वेगळा आणि स्वतंत्र धर्म मानतात. भारत सरकारने लिंगायत धर्माला अधिकृत मान्यता द्यावी, अशी अनेक वर्षांची मागणी आहे. जनगणनेच्या वेळी अनेक जण लिंगायत म्हणून स्वतंत्र नोंद करतात. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी लिंगदीक्षा घेणे आणि इष्टलिंग बांधून घेणे याला वेगळा राजकीय संदर्भ असणार आहे.
राहुलजींची हिंदुत्वाची वेगळी व्याख्या
राहुल गांधींनी मध्यंतरी हिंदुत्व आणि हिंदू धर्म यात भेद असल्याचे म्हटले होते हिंदू धर्मसहिष्णू आहे. पण हिंदुत्व आक्रमक आहे. हिंदुत्ववादी दुसऱ्या धर्माचा द्वेष करतात. महात्मा गांधी हिंदू होते आणि नथुराम गोडसे हिंदुत्ववादी होता, असे शरसंधान त्यांनी साधले होते. आता त्यांनी लिंगदीक्षा घेऊन आणि इष्टलिंग बांधून एक वेगळे पाऊल उचलल्याचे दिसत आहे. याचे नेमके परिणाम काय होतील?, हे नजीकच्या भविष्यात दिसून येणार आहे. पण राहुल गांधींचा यामागचा हेतू मात्र हिंदू आणि हिंदुत्व यांच्या दृष्टीने वेगळा असणार आहे हे उघड आहे.
कर्नाटकात 18% लिंगायत समाज
कर्नाटकात 18% लिंगायत समाज आहे. तो परंपरेने भाजपला मतदान करत आला आहे. पण आता दस्तूर खुद्द राहुल गांधी यांनी लिंगदीक्षा घेऊन इष्टलिंग बांधल्याने काँग्रेसच्या राजकीय भाग्यामध्ये काय फरक पडतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App