वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी प्रसारमाध्यमांतील कठोर टिप्पणीवर नाराजी व्यक्त केली म्हटले की, न्यायमूर्तींवर निशाणा साधण्याची एक मर्यादा असते. न्यायमूर्तींकडून सुनावणी न करण्याशी संबंधित वृत्तावर त्यांनी ही टिप्पणी केली. एका वकिलाने ख्रिश्चनांविरुद्ध हिंसाचार आणि हल्ल्यांविरुद्ध दाखल प्रकरणावर सुनावणी घेण्याची विनंती केली होती.Supreme Court Justice Chandrachud’s displeasure with the media: Give us a break too; Criticism of judges also has a limit!
न्या. चंद्रचूड म्हणाले, हे प्रकरण सुनावणीसाठी घेतले नसल्याचे वृत्त वाचले होते. आम्हा न्यायमूर्तींनाही थोडा ब्रेक द्या. गेल्या वेळी कोरोनामुळे मी सुटीवर होतो,त्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही. नॅशनल सॉलिडेरिटी फोरम, द इव्हेंजेलिकल फेलोशिप ऑफ इंडियाचे व बंगळुरू डायोसीजचे आर्चबिशप डॉ. पीटर मचाडो यांनी ही याचिका दाखल केली. यात ख्रिश्चनांवरील वाढते हल्ले व चौकशीच्या आदेशाची विनंती केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App