प्रतिनिधी
मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने यशस्वी असा 8 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. सलग दोन टर्म मोदी सरकार आहे. तरी देखील मोदी लाट अजूनही कायम असल्याचे म्हटले जात आहे. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी आतापासूनच या निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. या बाबत आता इंडिया टीव्हीने केलेल्या एका सर्व्हेनुसार देशात पुन्हा एकदा मोदी लाट येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. Congress will become the ground again in the Modi wave
जर लोकसभा निवडणुका लागल्या तर भाजप संपूर्ण देशात रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवेल असा अंदाज इंडिया टीव्हीने केलेल्या “मूड ऑफ नेशन” या ओपिनियन पोलमधून व्यक्त होत आहे. जर देशात आता लोकसभा निवडणुका लागल्या तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 362 तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला 97 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच इतर पक्ष व अपक्षांना 84 जागा मिळतील.
या राज्यांत भाजपचे वर्चस्व
जनमताचा कौल जाणून घेण्यासाठी इंडिया टीव्ही – मॅटराईजकडून हा सर्व्हे करण्यात आला होता. त्यानुसार 2019 च्या लोकसभा निवडणुकांपेक्षा जास्त जागा भाजपला 2024 मध्ये मिळतील असा अंदाज आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या देशातील महत्वाच्या आणि जास्त लोकसभा जागा असणा-या राज्यांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दक्षिणेतील केरळ आणि तामिळनाडू राज्यांत काँग्रेस आणि यूपीएची कामगिरी कायम राहणार असल्याचे या सर्व्हेतून समजत आहे.
काँग्रेसचे काय?
पंजाबमध्ये आप आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला आपले वर्चस्व ठेवण्यात यश मिळेल, असे दिसत आहे. उत्तर प्रदेशात भाजपला 80 पैकी 76, महाराष्ट्रात 48 पैकी 26 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर काँग्रेस पुरस्कृत यूपीएला मात्र सलग तिस-या निवडणुकीत संपूर्ण देशात दोन आकडी लोकसभा खासदारांवर समाधान मानावे लागणार असल्याचे या सर्व्हेमध्ये म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App