वृत्तसंस्था
चेन्नई : ख्रिश्चन मिशनऱ्या नसत्या तर तामिळनाडूची अवस्था बिहारसारखी झाली असती, असे वादग्रस्त विधान तामिळनाडू विधानसभेच्या अध्यक्षांनी केले आहे. त्यांनी तामिळनाडूच्या विकासाचे संपूर्ण श्रेय कॅथलिक मिशनरींना दिले. यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.Christian missionaries praised by Tamil Nadu Vidhan Sabha Speaker Said – If it were not for them, the state would have become Bihar!
तामिळनाडूच्या हिंदूंचा अवमान -भाजप
द्रमुक आमदार व अध्यक्ष एम. अप्पावु यांनी सोमवारी चेन्नईतील कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केले. दुसरीकडे, अप्पावु यांच्या विधानावर भाजपने हरकत नोंदवली आहे. अप्पावु यांचे वक्तव्य जातीयवादी आहे. द्रमुकची मानसिकता हिंदूविरोधी असून त्यांनी याप्रकरणी माफी मागितली पाहिजे, असे भाजप प्रवक्ते मोहन कृष्ण यांनी म्हटले आहे.
‘द्रमुक सरकार नेहमीच वादात राहते. या सरकारचा अजेंडा तामिळनाडूतील हिंदुंचा अवमान करुन हिंदू विरोधी प्रचाराला प्रोत्साहन देण्याचे आहे,’ असेही ते यावेळी म्हणाले.
काय म्हणाले होते विधानसभा अध्यक्ष ?
स्पीकर अप्पावु यांनी आपल्या आयुष्यात कॅथलिक मिशनरींचे महत्वाचे स्थान असल्याचे स्पष्ट केले. ‘हे सरकार तुम्ही सर्वी सर्वांनी (कॅथलिक समुदाय) बनवले आहे. मिशनरींना तामिळनाडूतून हटवले तर कोणताही विकास झाला नसता. तामिळनाडूचे हाल बिहारसारखे झाले असते,’ असे ते म्हणाले. या वादावर द्रमुक किंवा मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
वादानंतर सारवासारव
वादानंतर अप्पावु म्हणाले -‘मी केवळ इतिहास सांगत होतो. ख्रिश्चन संस्थांनी शिक्षणाचा पुरस्कार केला. समाजात समानता प्रस्थापित करण्यास मदत केली. माझ्या शिक्षणाचेही श्रेय मिशनरींनाच जाते.’
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App