प्रतिनिधी
चेन्नई : माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेकऱ्याची सुटका करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे तब्बल 30 वर्षांनी राजीव गांधींचा मारेकरी पेरारिवलन याची सुटका होणार आहे. ही बातमी येताच पेरारिवलन याची आई आणि दोन भाऊ ताबडतोब तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्या भेटीला पोहोचले. त्यांनी प्रत्यक्ष भेटून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. The culprit who supplied explosives for the assassination of Jeev Gandhi was released
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणातील पेरारिवलन दोषी आहे. 1991 मध्ये पेरारिवलनला अटक करण्यात आली होती.
AG Perarivalan, his mother Arputhammal and other members of their family meet Tamil Nadu CM MK Stalin in Chennai.
Supreme Court ordered the release of Perarivalan today. He is one of the convicts serving life imprisonment in connection with ex-PM Rajiv Gandhi's assassination. pic.twitter.com/uNk6xfaEW2
— ANI (@ANI) May 18, 2022
कोण आहे पेरारिवलन ?
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणातील दोषी पेरारिवलनला सन 1991 मध्ये अटक केली होती. राजीव गांधी यांच्या हत्याकांडाचा मुख्य सुत्रधार शिवरासन याला स्फोटाची सामग्री पुरवल्याचा आरोप पेरारिवलन याच्यावर आहे. 1999 मध्ये याच आरोपाखाली त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाने या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत केले. मार्च 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पेरारिवलन याला जामिन दिला आणि कारागृहातून सुटकेसाठी त्याने अर्ज केला. परंतु तामिळनाडू सरकारने त्याच्या अर्जाला विरोध करणारा दुसरा अर्ज दाखल केला नाही. त्यानंतर त्याने पुन्हा सुप्रीम कोर्टात दाद मागितली. ज्याअर्थी त्याच्या सुटकेच्या विरोधात तामिळनाडू सरकारने कोणता अर्ज दाखल केला नाही त्यामुळे त्याच्या सुटकेला तामिळनाडू सरकारचा विरोध नाही असे स्पष्ट झाले. यानंतर परारिवेलन याच्या सुटकेचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला.
हा देश एकाच परारी वेलन त्याची आई आणि 2 भाऊ तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्या भेटीला पोहोचले. प्रत्यक्ष भेटून त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
The culprit who supplied explosives for the assassination of Jeev Gandhi was released
महत्वाच्या बातम्या