प्रतिनिधी
मुंबई : 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे निर्देश दिल्यानंतर सुरू झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबई न्यायालयाने फेटाळला आहे. अनिल देशमुख यांनी दाखल केलेला जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे देशमुखांचा सीबीआय कोठडीतला मुक्काम वाढला आहे. Anil Deshmukh’s stay in CBI custody extended
अनिल देशमुख यांच्यासह त्यांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे देशमुखांना हा मोठा धक्का मानला जात असून त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचाराचे आरोप आहे. या आरोपानंतर ईडीने देशमुखांना अटक केली होती. त्यानंतर सीबीआयनेही कारागृहात जाऊन देशमुखांची गैरव्यवहाराप्रकरणी चौकशी केली होती. तसेच, दरमहा १०० कोटींच्या कथित खंडणी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार सीबीआयने गुन्हा नोंदवत या प्रकरणी तपास सुरू केला होता. त्यानंतर ईडीने याच एफआयआरमध्ये अनिल देशमुखांसह काही जणांना अटक केली होती. त्यामुळे आजही देशमुख तुरूंगातच आहेत.
अनिल देशमुख आणि त्यांचे सहकारी स्वीय सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांच्यावर सीबीआयने आरोपपत्र दाखल केले असून बडतर्फ पोलीस अधिक्षक सचिन वाझेला माफीचा साक्षीदार करण्यात आले आहे. त्याप्रकरणात देशमुखांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, अद्याप न्यायालयाने देशमुखांना दिलासा दिलेला नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App