प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडानंतर मोठा राजकीय भूकंप झाला. शिवसेना आणि अपक्ष मिळून 50 आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपने सरकार आले. मात्र, बहुमत चाचणीच्या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार अनुपस्थित होते. यात अशोक चव्हाणांसह काही मोठ्या नेत्यांचाही समावेश होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा रंगल्या होत्या. अशात आता गिरीश महाजन यांच्या एका दाव्याने खळबळ उडवली आहे.Like Shiv Sena, big revolt is expected in Congress; Girish Mahajan’s claim
काँग्रेस – राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते आपल्या संपर्कात आहेत, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. महाजन म्हणाले, की मी नावं सांगू शकत नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आता संपर्कात आहेत. आधीचं महाविकास आघाडीचं सरकार अपघाताने आलं होतं. माझ्या संपर्कातील लोकांना असं वाटतं की तिकडे राहून काही उपायोग नाही.
पुढे ते म्हणाले, की महाविकास आघाडीत सेनेची नैसर्गिक युती नव्हती. शिवसेना-भाजप एकत्र लढले होते. जनतेने आम्हाला निवडून दिले होते. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व विकासाच्या दृष्टीने नंबर एकवर आहे. त्यामुळे अनेकांना वाटतं की भाजपशिवाय आता पर्याय नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App