वृत्तसंस्था
रामपूर /आजमगड : उत्तर प्रदेशातील रामपूर आणि आजमगड लोकसभा मतदार संघांच्या पोटनिवडणुकीत भाजपने समाजवादी पक्षाच्या उमेदवारांवर मात करत समाजवादी पक्षाचे पारंपारिक राजकीय गड उध्वस्त केले आहेत. BJP wins Lok Sabha by-election in Rampur, Azamgarh up
रामपूर आणि आजमगड या दोन्ही मतदारसंघांमधून वर्षानुवर्षे समाजवादी पक्षाचे उमेदवारच विजयी होत होते. त्यातही लोकसभेचे 7 वेळचे खासदार आजम खान यांच्या उमेदवाराचा रामपूर मधून पराभव झाला आहे. भाजपने अतिशय जिद्दीने निवडणूक लढवून समाजवादी पक्षाचे दोन्ही पारंपारिक गड उध्वस्त करून दाखवले आहेत.
योगी सरकार करणार लखनऊमधील प्राचीन मंदिरांचा जिर्णोध्दार
आजमगड मधून 2019 मध्ये समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे तब्बल 2 लाख 6000 हजारांनी जिंकले होते. तुम्ही कोण त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता सध्या ते उत्तर प्रदेश विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत आता आजमगड मधून दिनेश लाल यादव निरहुआ हे भाजपचे उमेदवार तब्बल 45 हजार मतांनी विजय झाले आहेत.
रामपूर मधून भाजपचे घनश्याम लोधी यांनी विजय मिळवला असून आजपर्यंत या मतदारसंघात कायमच आजम खान किंवा त्यांच्या समर्थीत उमेदवाराने विजय मिळवला आहे. 2022 च्या पोटनिवडणुकीत देखील अजीम खान हे अजून खान यांचे समर्थक यांना समाजवादी पक्षाने तिकीट दिले होते. मात्र समाजवादी पक्षाला आपले पारंपरिक राजकीय गड टिकवता आले नाहीत.
हाच तो रामपुर लोकसभा मतदारसंघ आहे जिथून समाजवादी पक्षाची चलती असताना अभिनेत्री जयाप्रदा देखील लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. परंतु आता भाजपने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाचा दणदणीत पराभव करून त्यांचे पारंपरिक राजकीय गड उद्ध्वस्त करून दाखवले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App