प्रतिनिधी
मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भाजपने तिसरा उमेदवार निवडून आणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार घडवून आणला. मात्र या निवडणुकीतून महाविकास आघाडीतील आमदारांचा असंतोष समोर आला आहे, असे मत फडणवीस म्हणाले होते, या असंतोषाला तोंड फोडण्यासाठी भाजपने विधान परिषद निवडणुकीत पाचवा उमेदवार उभा केला, त्यात भाजप पाचवा उमेदवार प्रसाद लाड हे विजयी झाले.Maharashtra state council Elections : devendra Fadanavis showed his strength to Pawar and Sonia Gandhi
या निवडणुकीत पहिल्या फेरीतील 134 मते भाजपाला मिळाल्याने भाजपाकडे विधानसभेतील एकूण 288 पैकी 134 चे मताधिक्य आहे, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे भाजपची बहुमताकडे वाटचाल सुरु आहे, असे दिसते. त्यामुळे 288 पैकी 145 मते ही बहुमतासाठी आवश्यक आहेत, त्यातील 134 जागा भाजपाला मिळाली आहेत, हे पाहिल्यावर भाजप बहुमताच्या आकड्यापासून केवळ 11 मातांपासून दूर आहे.
आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लक्ष!
भाजपाकडे सध्या स्वतःचे 106 आमदार आहेत, तसेच अपक्ष आणि छोटे पक्ष यांचा पाठिंबा मिळून ती संख्या 116 होती, मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे चारही आमदार 134 मतांनी पहिल्या फेरीत निवडून आले. याचा अर्थ भाजपाला 17 अन्य आमदारांनी पाठिंबा दिला आहेत. ही मते अपक्ष, बविआच्या 3 मतांसह काँग्रेस, शिवसेना यांची मते फुटली आणि ती भाजपच्या पारड्यात पडली.
यावरून भाजपचे विधानसभेत १३३चे मताधिक्य निर्माण झाले आहे. यावरून उद्या जर विधानसभा अध्यक्षाची निवडणूक लागली आणि गुप्त मतदान झाले तर भाजपचा विधानसभा अध्यक्ष निवडून येऊ शकतो पर्यायाने भाजपचे सरकार पुन्हा येईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
महाविकास आघाडीची मते फुटली
भाजपचे चारही आमदार पहिल्या पसंतीत निवडून आले आणि प्रसाद लाड यांना 18 मते पहिल्या पसंतीची मिळाली आहेत. याचा अर्थ भाजपाला पहिल्या पसंतीची 134 मते मिळाली आहेत. यावरून महाविकास आघाडीतील शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसची मते फुटली आहेत, असे भाजपाचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले. भातखळकर हे पोलिंग एजंट होते.
श्रीकांत भारती आणि राम शिंदे यांना प्रत्येकी 30 मते मिळाली आहेत. प्रवीण दरेकर यांना 29 मते मिळाली आहेत. तर भाजपचा पाचवा उमेदवार प्रसाद लाड यांना 17 मते पहिल्या पसंदीची मते मिळाली. त्यामुळे दुसऱ्या फेरीतील सर्व मते आपोआप प्रसाद लाड यांना मिळाल्याने ते विजयी झाले आहेत. याचा सरळ अर्थ आहे की 285 पैकी 134 मते भाजपाला मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची पहिल्या पसंतीची मते फुटली आहेत, असे आमदार भातखळकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App