अग्निपथ योजना : संरक्षण मंत्रालयाचा अग्निवीरांसाठी आणखी संधींचा वर्षाव; 16 सेवांमध्ये 10 % आरक्षण!!; एकूण आरक्षण 55 %

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला देशातील तरूणांचा गैरसमजातून होत असलेला विरोध आणि या गैरसमजाला विरोधी पक्ष घालत असलेले खतपाणी या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अग्निवीरांसाठी विविध सवलती आणि प्रत्यक्ष कामाच्या योजना जाहीर केल्या आहेत. Ministry of Defense showers more opportunities for firefighters

केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय राखीव दलामध्ये तसेच आसाम रायफल्स मध्ये 10 % आरक्षण अग्निवीरांसाठी ठेवलेच आहे. त्याच बरोबर आता अग्निवीरांसाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या विविध 16 सेवांमध्ये स्वतंत्र 10 % आरक्षण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर केले आहे.

राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय सैन्य दलाच्या प्रमुखांची आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीनंतर संबंधित निर्णय जाहीर करण्यात आला. भारतीय लष्कर, वायुसेना, नौसेना, कोस्ट गार्ड, विविध सिविलियन सेवा आदी 16 सेवांमध्ये अग्निवीरांना 10 % टक्के आरक्षण असेल.

संरक्षण मंत्रालयाने हे आरक्षण जाहीर करण्याआधी केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय राखीव दल अर्थात सीएपीएफ आणि आसाम रायफल्स मध्ये 10 % टक्के आरक्षण जाहीर केले आहेच. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश पोलिस सेवेत अग्निवीरांना 10 % टक्के आरक्षण देण्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले आहे. आता त्यापाठोपाठ केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने संरक्षण सेवांमध्ये 10 % आरक्षण जाहीर केल्याने या सगळ्या आरक्षणाची बेरीज केली तर ते 55 % होत आहे.

  • – अग्निवीरांसाठी असे असेल आरक्षण :
  • – अग्निवीरांना कायम सेवेत संधी : 25 %
  • – सीएपीएफ आसाम रायफल्स : 10%
  • – संरक्षण मंत्रालय विविध 16 सेवा : 10%
  • – उत्तर प्रदेश पोलिस सेवा : 10 %

असे तब्बल 55 % आरक्षण अग्निवीरांसाठी आता जाहीर झाले आहे. चार वर्षे अग्निवीर म्हणून सेवा केल्यानंतर एकूण 55 % टक्के आरक्षण उपलब्ध होणार आहे.

कोस्ट गार्ड आणि अन्य 16 सेवांमध्ये माजी सैनिकांना आरक्षण आहेत. त्या व्यतिरिक्त 10 % आरक्षण अग्निवीरांना असणार आहे.

अग्निपथ योजनेतून कोणतीही व्यक्ती सर्व निकष आणि अटी शर्ती पूर्ण करून अग्निवीर म्हणून निवडली गेली की त्याला वर उल्लेख केलेल्या कोणत्या तरी आरक्षणा द्वारे संपूर्ण सेवेची संधी मिळणार आहे.

संरक्षण मंत्रालयाशी संबंधित सार्वजनिक 16 सेवांना अग्निवीरांसाठी 10 % आरक्षण लागू करण्यासाठी नियमावलीत बदल करण्याचे निर्देश संरक्षण मंत्रालयाने दिले आहेत. यामध्ये वयोमर्यादेत वाढ करण्याचे आदेशही समाविष्ट आहेत.

Ministry of Defense showers more opportunities for firefighters

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात