प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर येथे बुधवारी जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजपवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा बाबरी मशिदीच्या मुद्द्यावर भाजपवर टीका केली. यावेळी त्यांनी भाजप आमदार अतुल सावे यांना आवाहन केले. अतुल सावे यांचे वडील दिवंगत मोरेश्वर सावे यांच्यासह शिवसैनिक अयोध्येत गेले होते, याबाबत त्यांच्या मुलाने खरे-खोटे काय ते सांगावे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यांना आता अतुल सावे यांनी उत्तर दिले आहे. My father went to Ayodhya, but the Shiv Sena expelled him from politics; Atul Save’s reply to the Chief Minister
– फडणवीसांच्या कोंडीचा प्रयत्न
1992 साली बाबरी पाडण्यात आली त्यावेळी शिवसेनेचे मोरेश्वर सावे हे शिवसैनिकांसोबत अयोध्येला गेले होते. खरं वाटत नसेल तर आता भाजपमध्ये असलेले त्यांचे पुत्र आमदार अतुल सावे यांनाच फडणवीस यांनी विचारावे, असे सांगत बाबरी पाडायला शिवसैनिक उपस्थित नसल्याचा दावा करणा-या फडणवीसांना उद्धव ठाकरे यांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
– उद्धव ठाकरेंनी अर्धवट माहिती दिली
याला उत्तर देताना अतुल सावे यांनी उद्धव ठाकरे यांनी अर्धवट माहिती दिल्याचे म्हटले आहे. माझे वडील मोरेश्वर सावे हे अयोध्येला कारसेवक म्हणून गेले होते. पण त्यानंतर सुद्धा त्यांनी सातत्याने हिंदुत्वाची भूमिका ठामपणे मांडली. हे शिवसेनेला न आवडल्यामुळे माझ्या वडिलांचे खच्चीकरण करण्यात आले. त्यांना साधे लोकसभेचे तिकीटही शिवसेनेकडून देण्यात आले नाही. जर त्यांना माझ्या वडिलांचा इतकाच अभिमान होता तर त्यांना निवडणुकीसाठी तिकीट का देण्यात आले नाही?, असा थेट सवाल अतुल सावे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App