प्रतिनिधी
वाराणसी : ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यात अशा काही कलाकृती सापडल्या आहेत, की त्यामुळे हिंदू पक्षाचा कोर्टातला दावा प्रबळ होतो आहे. वजूखान्यात शिवलिंग, आत बांधलेल्या भिंतींवर त्रिशूल, कमळ, हत्ती, घंटा खोदलेले आहेत. त्यांचे आकार स्पष्टपणे दिसतात. Gyanvapi Mosque: Shivling at a distance of 83 feet from Nandi, lotus on the walls, trident, elephant
– ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा व्हिडिओ समोर आला आहे. यात वजूखान्यातील पाणी ओसरल्यानंतरचे फोटो आहेत.
– ज्ञानवापी परिसरात न्यायालयाच्या आदेशानुसार व्हिडीओग्राफी आणि फोटोग्राफी केली होती. हे सगळे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. न्यायालयाने नियुक्त केलेले आयुक्तांचे पथक सर्वेक्षण करत आहे. वजूखान्यातले बाहेर काढले जात आहे. पाणी थोडे ओसरल्यावर आत शिवलिंगासारखा आकार दिसत आहे. हिंदू पक्षाने यालाच शिवलिंग असल्याचे म्हटले आहे, तर मुस्लिम पक्षाने हे कारंजे असल्याचा दावा केला आहे.
-“नंदीपासून 83 फूट अंतरावर वजूखाना
शिवलिंगावर केलेल्या खुणा, दगडावर बारीक खुणा दिसतात आणि वरच्या बाजूला 5 कट आणि एक छिद्र दिसते. या आधारावर मुस्लिम पक्ष त्याला कारंजे म्हणत आहे. शिवलिंगावर या खुणा स्वतंत्रपणे बांधण्यात आल्याचा हिंदू पक्षाचा दावा आहे. या खूणाही वेगळ्याच दिसत आहेत.
सर्वेक्षणादरम्यान या छिद्रात लोखंडी सळी टाकून सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षण आयुक्त विशाल सिंह यांच्या अहवालानुसार, ही लोखंडी सळी फक्त 63 सेंटीमीटरपर्यंत खोल गेली.
ज्ञानवापी मशिदीच्या वर्तुळाबाहेर जाळीसारख्या भिंतीसमोर नंदी बसलेला आहे. या चित्रांमध्ये नंदी स्पष्टपणे दिसत आहे. नंदीचे तोंड त्या भिंतीकडे आहे. नंदीच्या अगदी समोर जाळीच्या भिंतीच्या पलीकडे एक शेड बांधण्यात आले आहे आणि याच्या आत वजूखाना बांधलेला आहे.
– नंदीच्या अगदी समोर, सुमारे 83 फूट अंतरावर, वजूखाना दिसतो. या वजूखानाच्या मध्यभागी शिवलिंगाचा आकार सापडला असून शिवमंदिरांमध्ये नंदीचे तोंड नेहमी शिवलिंगाकडे असते.
– भिंतींवर कमळ, हत्ती त्रिशूलाची आकृती
मशिदीच्या आत बांधलेल्या भिंतींवर त्रिशूलचा आकार स्पष्टपणे दिसतो आणि तो एकाच ठिकाणी नव्हे तर भिंतीवर अनेक ठिकाणी दिसतो आहे. रंगरंगोटीच्या माध्यमातून ते लपविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे.
मशिदीच्या भिंतीवर, खांबांवर अन्य काही कलाकृती दिसत असून मध्यभागी हत्तीची आकृती दिसते. काही ठिकाणी भिंतींवरही स्वस्तिकच्या खुणा आहेत. अशी आकृती मशिदीच्या बाहेरील भिंतीवरही दिसली आहे. या भिंतीवर आणि खांबांवर कमळ फुलासारखा आकार कोरून मधोमध एखाद्या घंटीसारखा आकार तयार करण्यात आला आहे.
अनेकजण बचावाच्या पवित्र्यात
असा हा डिटेल व्हिडिओ समोर आल्यानंतर चर्चेला उधाण आले आहे मात्र या चर्चेत मुस्लिम पक्षाबद्दल काही विशिष्ट घटक भाग घेत असून देवबंद मध्ये ज्ञानवापी मशिद, मथुरेतील ईदगाह मशिद आणि समान नागरी कायदा त्यांच्याबद्दल ठराव मंजूर करणाऱ्या जमियात उलेमा ए हिंद या संघटनेचे सदस्य मात्र आता जपून बोलताना दिसत आहेत. देवबंद येथील उलेमांच्या मेळाव्यात मात्र बाबरी मशीद शहीद झाल्यानंतर बाकी कोणतीही मशिद शहीद होऊ देणार नाही अशी भाषा उलेमांनी वापरली होती. पण आता ज्ञानवापी मशिदीतील नवीन पुरावे समोर आल्यानंतर त्यातले अनेक जण बचावाच्या पवित्र्यात गेलेले दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App