
वृत्तसंस्था
बेंगलुरू : भारतीय किसान युनियनचे नेते राकेश यांच्यावर कर्नाटकची राजधानी बंगलोर मधील एका कार्यक्रमात काळी शाई फेकण्यात आली आहे. स्थानिक शेतकरी नेते के. चंद्रशेखर यांच्या समर्थकांनी ही शाई फेकल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र राकेश टीकाही त्यांनी आपल्या कार्यक्रमाला कर्नाटक पोलिसांनी जाणून-बुजून सुरक्षा पुरवली नाही म्हणून हा प्रकार घडला, असा आरोप केला आहे. शाई फेकण्या प्रकरणी बंगलोर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. Threw black ink on Rakesh Tikait; Tikait accuses BJP government !!
कृषी कायदे केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर तसेच त्यानंतर खुद्द राकेश टिकैत यांच्या भारतीय किसान युनियन मध्ये फूट पडल्यानंतर प्रथमच राकेश टिकैत हे दक्षिणेतील राज्याच्या मोहीमेवर आले होते.
Three persons have been detained for throwing black ink at Bhartiya Kisan Union leader Rakesh Tikait at an event in Bengaluru, Karnataka: High Grounds Police Station
— ANI (@ANI) May 30, 2022
बंगलोर मधील एका सभागृहात त्यांचे कार्यक्रम सुरू असताना के. चंद्रशेखर यांचे समर्थक तिथे जमले होते. राकेश टिकैत यांना के. चंद्रशेखर यांच्या शेतकरी आंदोलनाला बाबत आपल्याला काय वाटते?, असे विचारले असता आपला त्या आंदोलनाशी काही संबंध नाही, असे उत्तर त्यांनी दिले. त्यानंतर चंद्रशेखर समर्थकांनी यांच्यावर काळी शाई फेकली आहे. मात्र, भाजपा सरकारने आपल्या कार्यक्रमाला पुरेशी सुरक्षा व्यवस्था दिली नाही म्हणून हा प्रकार घडला, असा आरोप त्यांनी केला आहे.
Threw black ink on Rakesh Tikait; Tikait accuses BJP government !!
महत्वाच्या बातम्या
- पश्चातबुध्दी : आधी सिध्दू मुसेवालाची सुरक्षा हटविली, हत्येनंतर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून तपासाचे मिनिट टू मिनिट मॉनिटरिंग
- राज्यसभा निवडणूक : धनंजय महाडिक रेसमध्ये आल्याने चुरस; शिवसेनेचे बीपी हाय!!
- जमियतचे दिसले असली रंग; देवबंद मधील बैठकीत समान नागरी कायद्याविरुद्ध ठराव मंजूर!!
- संभाजीराजेंच्या नेतृत्व उदयामुळे पश्चिम महाराष्ट्रात कोणाचे नुकसान??; देवेंद्र फडणवीसांचे राष्ट्रवादीकडे बोट!!