वीर सावरकरांना काँग्रेस निष्ठ आणि कम्युनिस्ट इतिहासकार कितीही ब्रिटिश निष्ठ किंवा असभ्य भाषेत ब्रिटिशांचे हस्तक म्हणत असले तरी प्रत्यक्षात ब्रिटिश उच्चपदस्थांना सावरकरांकडे पाहण्याचा नेमका दृष्टिकोन कसा होता… त्यातही सावरकर रत्नागिरीतून बाहेर पडून प्रत्यक्ष राजकारणात आल्यानंतर त्यांच्याविषयी ब्रिटिश उच्चपदस्थ नेमका काय विचार करायचे…??, याच्या ब्रिटिशांनी लिहून ठेवलेल्या “सिक्रेट नोट्स” लक्षात घेतल्या आणि त्यातले “बिटवीन द लाईन्स” वाचले तर सावरकरांची हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठा वेगळ्या नसल्याचेच दिसून येते. British Reports On Savarkar : hindu militarization counter to jinnahs muslim militarization
– विभाजनाची क्रिप्स योजना फेटाळली
1942 मध्ये जेव्हा क्रिप्स मिशन भारतात आले त्यावेळी सावरकर यांच्या नेतृत्वाखाली हिंदुमहासभेचे शिष्टमंडळ स्ट्रॅफोर्ड क्रिप्स यांना नवी दिल्लीत भेटले. कोणत्याही स्थितीत भारताचे विभाजनाला मान्यता नाही. ती सोडून बाकीच्या प्रस्तावावर सावरकर यांनी मान्यता दिली. हिंदू महासभा व्हाइसरॉय कॉन्सिल मध्ये म्हणजे सध्याच्या भाषेत बोलायचे झाले तर केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी व्हायला तयार झाली, पण कोणत्याही स्थितीत भारतातल्या प्रांतांना स्वायत्तता देण्याच्या नावाखाली भारताचे विभाजन सावरकरांना मान्य नव्हते.
प्रस्ताव पूर्ण स्वीकारा किंवा पूर्ण नाकारा ही क्रिप्स मिशनची पूर्वअट होती. त्यामुळे सावरकर यांच्या नेतृत्वाखाली हिंदू महासभेने क्रिप्स मिशनचा प्रस्ताव पूर्णपणे फेटाळल्यानंतर सावरकर नवी दिल्लीहून मुंबईला परतले. त्यानंतर मुंबई प्रांताचे गव्हर्नर लॉरेन्स रॉजर ल्यूमले यांनी सावरकरांना भेटीला बोलवले होते. त्यावेळी सावरकरांशी झालेल्या चर्चेची “सिक्रेट नोट” गव्हर्नर ल्यूमले यांनी त्यावेळचे व्हाइसरॉय लॉर्ड वेव्हेल यांना पाठवली होती.
या “सिक्रेट नोट”मध्ये गव्हर्नर लॉरेन्स रॉजर ल्यूमले म्हणतात :
सावरकर हे ब्रिटिशांचे “तात्पुरते सहयोगी” (temporary ally) होऊ शकतात पण ते “धोकादायक मित्र” (dangerous friend) आहेत. ते “अँटी मुस्लिम” तर आहेतच, पण तितकेच “अँटी ब्रिटिश” आहेत, हे विसरता कामा नये. गांधींना ते अहिंसेच्या मुद्द्यावरून विरोध करतात पण ब्रिटीशांशी गनिमी काव्याचे युद्ध खेळण्याचे ते पुरस्कर्ते आहेत. काँग्रेसने व्हॉईसरॉय कौन्सिल मध्ये येण्याचे टाळले, तर हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग एकाच वेळेला व्हॉईसराय कौन्सिल मध्ये येतील आणि त्यांच्यात जोरदार संघर्ष होईल हे निश्चित…!! बॅरिस्टर मोहम्मद अली जीना हे भारतीय लष्कराचे मुस्लिमीकरण करण्याचा प्रयत्न करतील. त्यातही पंजाबी मुस्लिमांचे वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न करतील, तर सावरकर हिंदू सैनिकीकरणाचा आग्रह धरतील. त्यातून मी नक्की सांगतो, ब्रिटिशांसाठी भारतीय प्रश्न (Indian Crisis) चिघळेल…!!
गव्हर्नर लॉरेन्स रॉजर ल्यूमले यांचीही “सिक्रेट नोट” सावरकरांच्या भूमिकेवर प्रकाश टाकते. कोणत्याही स्थितीत ब्रिटिशांशी आणि मुस्लिमांशी अनावश्यक तडजोड करायची नाही ही सावरकरांची अखेरपर्यंतची भूमिका होती, तीच यानिमित्ताने अधोरेखित होताना दिसते.
ब्रिटिश गव्हर्नरने सावरकरांना “अँटी मुस्लिम” आणि “अँटी ब्रिटिश” ठरवणे हे ब्रिटिशांच्या दृष्टीने जरी दूषण असले, तरी सावरकरांच्या दृष्टीने भूषण ठरले आहे…!! भारताच्या अंतर्गत राजकारणाची किती खोलवर जाण ब्रिटिश गव्हर्नरला होती, त्याचबरोबर ती सावरकर आणि मोहम्मद अली जिना यांना देखील आपापल्या भूमिकांत संदर्भात होती हे देखील या निमित्ताने स्पष्ट होताना दिसते आहे.
– पंजाबी मुस्लिमांचे वर्चस्व मोडण्याची भूमिका
विक्रम संपत यांनी लिहिलेल्या सावरकर चरित्रामध्ये या “सिक्रेट नोट”चा आवर्जून उल्लेख केला आहे. मोहम्मद अली जिना यांना भारतीय लष्करात पंजाबी मुस्लिमांचे वर्चस्व हवे होते, हे “सिक्रेट नोट” मधले वक्तव्य आजही पाकिस्तान संदर्भात बरेच काही भाष्य करून जाते…!!
पाकिस्तानी लष्करात पंजाबी मुस्लिमांचे वर्चस्व ही तिथल्या जनतेसाठी “गले की हड्डी” बनली आहे. किंबहुना याच पंजाबी मुस्लिमांच्या वर्चस्वातून बांगलादेशाच्या निर्मितीपर्यंत वेळ येऊन ठेपली होती. सावरकरांनी हिंदू सैनिकीकरणाचा धरलेला आग्रह हा बॅरिस्टर मोहम्मद अली जीना यांच्या मुस्लिम लष्करीकरणाच्या प्रयत्नांना काटशह देण्याचाच प्रकार होता, हे देखील यास ब्रिटीश गव्हर्नरांच्या “सिक्रेट नोट” मधून अधोरेखित होताना दिसते आहे…!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App