वृत्तसंस्था
जयपूर : काँग्रेसने उदयपूर मध्ये दोन दिवसाचे चिंतन शिबिर घेतले खरे पण चिंतन शिबिरात पासूनच काँग्रेसला लागलेली गळती अजूनही थांबायला तयार नाही किंबहुना काँग्रेसमध्ये चिंतना नंतरच संघटनात्मक चिंता जास्त वाढल्याचे दिसून येत आहे. Rajasthan Sports Minister Ashok Chandna angry; Demand for removal of Chief Minister Ashok Gehlot
राजस्थानचे क्रीडामंत्री आणि काँग्रेसचे तरुण नेते अशोक चांदना यांनी आपल्याकडचे मंत्रिपद काढून घेण्याची मागणी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याकडे केली आहे. राज्याचे क्रीडा सचिव कुलदीप रांका हेच सध्या सर्व विभागांचे मंत्री आहेत मग माझ्याकडे मंत्रीपद कशाला ठेवता?? हे अपमानास्पद मंत्री पर माझ्याकडून एकदाचे काढूनच घ्या, अशी उद्विग्न मागणी अशोक चांदना यांनी केली आहे. क्रीडा सचिव कुलदीप रांका यांच्याशी चांदना यांचा वाद आहे.
माननीय मुख्यमंत्री जी मेरा आपसे व्यक्तिगत अनुरोध है की मुझे इस ज़लालत भरे मंत्री पद से मुक्त कर मेरे सभी विभागों का चार्ज श्री कुलदीप रांका जी को दे दिया जाए, क्योंकि वैसे भी वो ही सभी विभागों के मंत्री है। धन्यवाद — Ashok Chandna (@AshokChandnaINC) May 26, 2022
माननीय मुख्यमंत्री जी मेरा आपसे व्यक्तिगत अनुरोध है की मुझे इस ज़लालत भरे मंत्री पद से मुक्त कर मेरे सभी विभागों का चार्ज श्री कुलदीप रांका जी को दे दिया जाए, क्योंकि वैसे भी वो ही सभी विभागों के मंत्री है। धन्यवाद
— Ashok Chandna (@AshokChandnaINC) May 26, 2022
– क्रीडापटू अशोक चांदनांचे पुण्यात शिक्षण
38 वर्षीय अशोक चांदना हे उत्तम जलतरणपटू आणि क्रिकेटपटू असून त्यांनी राजस्थानचे प्रतिनिधित्व विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये केले आहे. बुंदी जिल्ह्यातून निवडून येतात. त्यांचे शिक्षण पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातून झाले आहे. 2009 मध्ये अशोक चांदना यांनी युवक काँग्रेसमध्ये कार्यकर्ता म्हणून प्रवेश केला. त्यानंतर राजस्थान प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष पद भूषवले. 2018 मध्ये अशोक गहलोत यांनी आपल्या मंत्रिमंडळात त्यांचा क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री म्हणून समावेश केला. पण आता ते आपल्याच खात्याच्या सचिवांवर नाराज होऊन मंत्रीपदापासून मुक्त होऊ इच्छितात.
– भाजपचे शरसंधान
अशोक चांदना यांच्या नाराजी वरून भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर जोरदार शरसंधान साधले आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये अशा बऱ्याच घडामोडी घडतील. कारण काँग्रेसचे जहाज बुडणार आहे, असे ट्विट भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सतीश पुनिया यांनी केले आहे. केंद्रीय जलसंपत्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे अशोक चांदना यांच्या उद्विग्न मागणीमुळे काँग्रेस पक्षात देखील खळबळ आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App