वृत्तसंस्था
मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या तब्बल 41 मालमत्ता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने एका झटक्यात जप्त केल्या आहेत. त्यांच्या 36 मालमत्तांवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काहीच दिवसांपूर्वी छापे घातले होते. त्यापुढे जाऊन आता सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने यशवंत जाधव यांना जबाब नोंदवण्यासाठी समाज पाठवले असून यशवंत जाधव यांनी परकीय गुंतवणूक कायद्याचा भंग करून गुंड विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याचा संशय व्यक्त केला आहे. याबाबत त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांनी ईडीच्या कार्यालयात हजर व्हावे, असे समन्स यशवंत जाधव यांना पाठवले आहे. इकॉनॉमिक इंटेलिजन्स डिपार्टमेंटने याबाबत चौकशी केली आहे. ED summons Yashwant Jadhav, close to Matoshri
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जप्त केलेला 41 प्रॉपर्टीज यशवंत जाधव यांनी गेल्या दोन वर्षात खरेदी केल्याचे आढळून आले आहे तसेच या मालमत्तांचे व्यवहार करताना हवाला मार्फत पैसे दिल्याचे लक्षात आले आहे. संबंधित मालमत्तासंबंधीचा हिशेब इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने यशवंत जाधव यांच्याकडे मागितला आहे. हा हिशेब दिला नाही तर येत्या सहा महिन्यांमध्ये या मालमत्तांचा लिलाव करण्यात येईल, असेही सांगण्यात येत आहे.
Enforcement Directorate summons Shiv Sena leader Yashwant Jadhav for questioning in connection with alleged violation of FEMA (Foreign Exchange Management Act) rules, the economic intelligence agency said (File pic) pic.twitter.com/uKgjtbtY3y — ANI (@ANI) May 25, 2022
Enforcement Directorate summons Shiv Sena leader Yashwant Jadhav for questioning in connection with alleged violation of FEMA (Foreign Exchange Management Act) rules, the economic intelligence agency said
(File pic) pic.twitter.com/uKgjtbtY3y
— ANI (@ANI) May 25, 2022
राऊतांबद्दल रदबदली, जाधवांवर कारवाई
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे मावळते खासदार संजय राऊत यांच्याबद्दल रदबदली केली तरी देखील केंद्रीय तपास संस्थांची कायदेशीर कारवाई थांबलेली नाही हेच यशवंत जाधव यांच्या 41 मालमत्ता जप्त करण्यावरून स्पष्ट होत आहे.
यशवंत जाधव यांच्या डायरीत मातोश्रीला दिलेल्या घड्याळाचा आणि 50 लाखांचा उल्लेख आहे तसेच केबलमॅन आणि एम ताई असा उल्लेख आहे. हा केबलमॅन कोण आणि एम ताई कोण या विषयी राजकीय वर्तुळात चर्चा होती. हे केबलमॅन सध्या ठाकरे – पवार मंत्रिमंडळात असल्याचे बोलले जात आहे, तर मुंबई महापालिकेत होत्या अशीही चर्चा आहे.
पण आता चर्चेच्या पलिकडे जाऊन इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यशवंत जाधव यांच्या 41 मालमत्ता जप्त केल्या आहेत आणि आता ईडीने यांना जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे समन्स पाठवले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App