यशवंत जाधव यांच्या डायरीतले “केबलमॅन” आणि “एम ताई” कोण??; गौडबंगालाचा शोध!!


प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या संशयास्पद डायरीत मातोश्री व्यतिरिक्त आणखी दोन नावे आढळली आहेत. ती म्हणजे “केबल मॅन” आणि “एम ताई”. या दोघांनाही प्रत्येकी 25 आणि 50 लाख रुपये दिल्याचा उल्लेख यशवंत जाधव यांचा डायरीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या डायरीचा तपास इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करत आहे. या गौडबंगालाचा शोध घेण्यात येत आहे.Who are “Cableman” and “M Tai” in Yashwant Jadhav’s diary ??; Discovery of Gaudbengala

यशवंत जाधव यांनी मातोश्रीला अडीच लाख रुपयांचे घड्याळ दिले आणि 50 लाख रुपये दिले असा उल्लेख आधीच आढळला होता. त्यावरून मातोश्री म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वडिलार्जित निवासस्थान मातोश्री असा राजकीय अर्थ काढण्यात आला होता. मात्र, मातोश्री म्हणजे आपली आई असा खुलासा यशवंत जाधव यांनी केला होता. यावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने विश्वास ठेवलेला नाही.मात्र आता त्या पलिकडे जाऊन “केबल मॅन” आणि “एम ताई” या दोघांना प्रत्येकी 25 आणि 50 लाख रुपये दिल्याचा उल्लेख यशवंत जाधव यांच्या डायरीत असल्याचे आढळून आले आहे. “केबल मॅन” म्हणजे नेमके कोण आणि “एम ताई” कोण?, याविषयीचा खुलासा अद्याप झालेला नाही. परंतु “केबल मॅन” हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत तर “एम ताई” या मुंबई महापालिकेत होत्या असा संशय राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

Who are “Cableman” and “M Tai” in Yashwant Jadhav’s diary ??; Discovery of Gaudbengala

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण